ETV Bharat / state

वाशिम जिल्ह्यात रविवारी संचार बंदी नाही- जिल्हाधिकारी - जिल्हाधिकारी वाशिम बातमी

या आदेशाला १५ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, मात्र आता या आदेशात बदल करून सर्व दुकाने, आस्थापना रविवारी सुद्धा सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालय
author img

By

Published : Mar 13, 2021, 11:37 AM IST

वाशिम- कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशात अंशतः बदल करण्यात आला आहे. आता रविवारी सुध्दा सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व दुकाने,आस्थापना सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केले आहे.

असा आहे आदेश
जिल्ह्यात २६ फेब्रुवारी रोजी लागू करण्यात आलेल्या आदेशानुसार प्रत्येक शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत डेअरी, दूध विक्री करणारी दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. या आदेशाला १५ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, मात्र आता या आदेशात बदल करून सर्व दुकाने, आस्थापना रविवारी सुद्धा सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व दुकाने, आस्थापना सातही दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील. असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केले आहे. या आदेशामुळे दिलासा व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा-महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : कोल्हापुरात बसवर दगडफेक

हेही वाचा-मनसुख हिरेन हत्या प्रकरण: सचिन वाझे अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.