वाशिम - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेने धडक मोर्चा काढला.
यावेळी डफडे वाजवत मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवून शेतमालाला योग्य भाव द्यावा तसेच बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
हेही वाचा - शेतकरी अडचणीत: पीक विमा कंपन्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचा कार्यलयात ठिय्या
यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी बाजार समिती सभापतींना मागण्यांचे निवेदन दिले. तसेच मागण्या मान्य झाल्या नाहीत तर यापुढे उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला. या दरम्यान, मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा सहभाग होता.