वाशिम - परतीच्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर अनेकांचा संसार देखील आता उघड्यावर पडला असून शेती पीक वाहून गेल्याने खाणार काय? असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. यानंतर अनेक राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी आंदोलनही केले. त्यानंतर सरकारने शुक्रवारी अतिवृष्टीसाठी १० हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले. त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी नाराजी व्यक्त करत सरकारवर टीका केली आहे. ते वाशिम जिल्ह्यात दुष्काळी दौऱ्यावर होते.
आम्हाला मान्य नाही... भिकेचा तुकडा टाकल्या सारखी ही 10 हजाराची मदत - राविकांत तुपकर - नुकसान भरपाई मान्य नाही
राज्य सरकारने शुक्रवारी शेतकऱ्यांना अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी पोटी पॅकेज जाहीर केले. त्यावरून शेतकरी संघटनेने नाराजी व्यक्त करत सरकारवर टीका केली आहे.