ETV Bharat / state

पोळा, मारबत व तान्हा पोळा सण सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्यास मनाई - Washim corona infection prevention

कोणत्याही गावात, शहरात बैलपोळा भरविण्यात येवू नये, अथवा मिरवणूक काढण्यात येवू नये, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या बैलांचे घरच्या घरी कोड-कौतुक करता यावे, यासाठी शेतकरी उत्साहात आहेत. ते पोळा सण साजरा करण्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तू खरेदी करताना शहरात दिसून येत आहेत.

वाशिम बैलपोळा न्यूज
वाशिम बैलपोळा न्यूज
author img

By

Published : Aug 18, 2020, 7:47 AM IST

Updated : Aug 18, 2020, 9:13 AM IST

वाशिम - जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही गावात अथवा शहरात बैलपोळा भरविण्यात येवू नये, अथवा मिरवणूक काढण्यात येऊ नये, असे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी काढले आहेत. तरीही, उद्यावर येऊन ठेपलेल्या पोळा सणादिवशी आपल्या लाडक्या बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी शेतकरी गर्दी करत आहेत.

पोळा, मारबत व तान्हा पोळा सण सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्यास मनाई
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यात सर्व प्रकारचे उत्सव, मेळावे आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे १८ ऑगस्ट २०२० रोजी होणारा पोळा, १९ ऑगस्ट २०२० रोजी मारबत व तान्हा पोळा हे सण सार्वजनिक स्वरुपात साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही गावात, शहरात बैलपोळा भरविण्यात येवू नये, अथवा मिरवणूक काढण्यात येवू नये, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. मात्र, बैलपोळ्याशी शेतकऱ्यांच्या भावना जोडलेल्या असतात. त्यामुळे आपल्या लाडक्या बैलांचे घरच्या घरी कोड-कौतुक करता यावे, यासाठी शेतकरी उत्साहात आहेत. ते पोळा सण साजरा करण्याकरिता लागणाऱ्या विविध वस्तू खरेदी करताना शहरात दिसून येत आहेत.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे उत्सव, कार्यक्रम टाळणे आवश्यक आहे. अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होऊ शकत नसल्याने कोरोना विषाणूचा संसर्गाची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पोळा, मारबत व तान्हा पोळा हे सण सार्वजनिक स्वरुपात साजरे न करता, हे सण घरगुती स्वरुपात वैयक्तिकपणे साजरे करावेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० व भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलाम १८८ तसेच साथरोग अधिनियम १८९७ अन्वये दंडनीय व कायदेशीर कार्यवाही करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Last Updated : Aug 18, 2020, 9:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.