ETV Bharat / state

पोलीस करतायत दोरीच्या सहाय्याने वाहतूक थांबवून वाहनांना दिशा दाखविण्याचे काम - news about corona virus

ग्रीन झोनमध्ये वाहतूक सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.यामुळे वाशीम शहरात पोलिसाना वाहतूक दोरीच्या सहायाने थांबवून तीला दिशा दाखविण्याचे काम करावे लागत आहे.

police-use-ropes-to-stop-traffic-and-direct-vehicles
पोलीस करतायत दोरीच्या सहाय्याने वाहतूक थांबवून वाहनांना दिशा दाखविण्याचे काम
author img

By

Published : May 6, 2020, 5:00 PM IST

वाशिम - कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या टाळेबंदीचा ताण पोलीस प्रशासनावर पडत आहे. संचारबंदीतून मोकळीक मिळाल्यानंतर रस्त्यावर होणाऱ्या गर्दीला नियंत्रित करणे पोलिसांसाठी मोठे जीकरीचे काम झाले आहे. त्यासाठी शहर पोलीसांनी दोरीच्या सहायाने वाहतूक थांबवून वाहनांना दिशा दाखवण्याचे काम सुरु केले आहे.

पोलीस करतायत दोरीच्या सहाय्याने वाहतूक थांबवून वाहनांना दिशा दाखविण्याचे काम

वाशिम शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या प्रमुख पाटणी चौकात ट्रॅफिक सिग्नल बसविण्याची कार्यवाही ३१ मार्च अखेर पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, कोरोनामुळे हे काम होऊ शकले नाही. त्यामुळे आज सिग्नलच्या भूमीकेत पोलीस काम करत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये वाशिम जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने जिल्हा प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवांसह इतरही काही दुकाने, सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे यावेळेत नागरिक एकच गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे.

या गर्दीला आळा बसवा म्हणून पोलीस प्रशासन युक्ती चालवून दोरीच्या साह्याने सिग्नलच्या भूमिकेत उभे दिसून येत आहेत. ये जा करणाऱ्या वाहनाला दिशा दाखवून चौकातील गर्दी कमी करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.