वाशिम - कोरोना आजार पसरूनये यासाठी संचारबंदी कायदा लागू केला आहे. नागरिकांना पुन्हा-पुन्हा प्रशासनाकडून आव्हान करण्यात येत आहे. घराबाहेर पडू नये. मात्र, नागरिक ऐकत नसल्याने संचार बंदी कायद्याचे उल्लंघन करून, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्याना पोलीस चांगलाच चोप देत आहेत. शहराचा मुख्य असलेल्या पाटणी चौकात पोलीस कारवाई करत असून रस्त्यावरील फिरणाऱ्याना पोलीस चोप देताना दिसत आहेत.
वाशिममध्ये संचारबंदी कायदा लागू केला आहे. त्यामधून जीवनावश्यक वस्तू किराणा, दूध, भाजीपाला याची दुकाने सुरू आहेत. नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याने त्यांना चोप देत आतापर्यंत सात जनावर कारवाई केली आहे.