वाशिम - आरक्षणाच्या मागणीसाठी वाशिममध्ये आज वैदर्भीय नाथ जोगी समाज संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भिक्षा मांगो आंदोलन करण्यात आले. यावेळी नाथ जोगी समाजाच्या वतीने शासनाकडे इतरही मागण्या करण्यात आल्या आहेत.
नाथ जोगी समाजाचा महाराष्ट्रात भटक्या जमातीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे समाजावर अन्याय होत आहे. नाथ जोगी समाजाला अनुसूचित जाती जमातीमध्ये समाविष्ट करावे, आणि या प्रवर्गाला सरकारकडून मिळणारे सर्व लाभ नाथ जोगी समाजाला देण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सरकारने आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.