वाशिम - गेल्या वर्षी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक जण आर्थिक आडचणीत सापडले आहेत. मात्र याच काळात महावितरणकडून नागरिकांना भरमसाठ वीजबिल पाठवण्यात आले, जे नागरिक वीजबिल भरणार नाहीत, त्यांचे वीज कनेक्शन कापण्यात येत आहे. याविरोधात वाशिममध्ये मनसेच्या वतीने भिक मांगो आंदोलन करण्यात आले.
मनसेच्या वतीने महावितरण कार्यालयाला निवेदन
दरम्यान या आंदोलनातून जमा झालेली 650 रुपयांची रक्कम महावितरण कार्यालयात भरून पावती घेण्यात आली. यावेळी मनसेच्या वतीने महावितरणला निवेदन देण्यात आले असून, वीजबिल माफीची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिल माफीचे आश्वासन दिले होते, मात्र अद्यापही बिल माफ करण्यात आलेले नाही. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोक अडचणीत आहेत, ते हे बिल कसे भरणार असा सवाल या निवेदनात मनसेच्यावतीने करण्यात आला आहे. तसेच वीजबिल माफ न झाल्यास यापुढे आनखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही महावितरणला देण्यात आला आहे.
हेही वचा - पुण्यातल्या धायरी औद्योगिक वसाहतीत भीषण आग, कोट्यवधी रुपयांचे नुकसान