वाशिम - बचतगटांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील महिला संघटीत झाल्या आहेत. आता त्या उद्योग-व्यवसाय करत आहे. त्यांनी उत्पादित केलेले खाद्यपदार्थ आणि वस्तू या रुरल मार्टच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाची जास्तीत-जास्त विक्री व्हावी आणि महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात, यासाठी असे रुरल मार्ट प्रत्येक जिल्ह्यात असावेत, असे मत महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी महिला व बाल विकास विभाग योजनांचा जिल्हा परिषद येथील बैठकीत व्यक्त केले. याच बैठकित माविम अंतर्गत ७ लोकसंचालित साधन केंद्रांना तेजश्री फायनान्स सर्व्हिसेस अंतर्गत एकूण १ कोटी ३ लक्ष नऊ हजार रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले.
ग्राम बाल विकास केंद्र, एकात्मिक बाल विकास योजना, अंगणवाडी केंद्रांमधील सुविधा, माझी कन्या भाग्यश्री, वन स्टॉप सेंटर, डिजिटल अंगणवाडी आदी योजनांचा अॅड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी आढावा घेतला. या सभेत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन झाले नसल्याचे दिसून आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार अमित झनक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, समाज कल्याण सभापती वनिता देवरे, महिला व बालकल्याण सभापती शोभा गावंडे, बांधकाम सभापती विजय खानझोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीणसह शहरी महिला आर्थिकदृष्ट्या स्वालंबी व्हाव्यात - यशोमती ठाकूर - वाशिम महिला बचत गट कर्ज वाटप बातमी