ETV Bharat / state

शिरपूरमध्ये बाजार बंदीच्या सूचना देऊनही बाजार सुरू - corona washim

शिरपूर येथील गुजरी चौक येथे भरविण्यात आलेल्या बाजारात मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे शिरपूर पोलिसांनी हस्तक्षेप करून हा आठवडी बाजार बंद केला.

corona washim
शिरपूरमध्ये बाजार बंदीचे सूचना देऊनही बजार सुरू
author img

By

Published : Mar 19, 2020, 3:05 AM IST

वाशिम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आठवडी बाजार बंद ठेवण्याच्या सूचना दिल्यानंतरही शिरपूर येथे आज आठवडी बाजार भरवण्यात आला होता. मात्र, काही वेळानंतर शिरपूर पोलिसांनी हा आठवडी बाजार बंद करून प्रशासनाच्या आदेशाचे पालन करण्याची ताकीद दिली.

शिरपूरमध्ये बाजार बंदीचे सूचना देऊनही बजार सुरू

हेही वाचा - COVID 19 : 50 टक्के उपस्थितीची अंमलबजावणी न केल्यास दंड वसूल केला जाणार, पालिका आयुक्तांची माहिती

कोरोना आजाराची खबरदारी म्हणून, जिल्ह्यातील आठवडी बाजार न भरविण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या होत्या. तरी शिरपूर येथे व्यापाऱ्यांनी आठवडी बाजार भरवला. गुजरी चौक येथे भरविण्यात आलेल्या बाजारात मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे शिरपूर पोलिसांनी हस्तक्षेप करून हा आठवडी बाजार बंद केला. बाजार बंद करण्यात आल्याने व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.