ETV Bharat / state

प्रेमी युगुलाचे रिसोडच्या पोलीस ठाण्यातच 'शुभमंगल' - love marriage in police station washim

भर जहाँगीर येथील युवक पवन आणि त्याच्या गावातीलच तरुणी मनिषा या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळून दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दोन्ही कुटुंबांमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला. दरम्यान, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सत्यनारायण फुके आणि रिसोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष नेमणार यांनी दोन्ही कुटुंबीयांचे मनोमिलन घडवून आणले.

प्रेमी युगुलाचे रिसोडच्या पोलीस ठाण्यातच 'शुभमंगल'
author img

By

Published : Nov 1, 2019, 12:29 PM IST

वाशिम - एका प्रेमीयुगुलाच्या हट्टापायी कुटुंबीयांच्या उपस्थितीतच चक्क रिसोड येथील पोलीस ठाण्यात विवाह लावण्यात आला. कुटुंबाचा, समाजाचा विरोध झुगारून एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याच्या आणाभाका या प्रेमीयुगुलाने घेतल्या होत्या. पवन रमेश कांबळे आणि मनिषा संतोष मानवतवर, असे प्रेमीयुगुलाचे नाव आहे.

हेही वाचा - मुरबाडमध्ये एसटी आणि खासगी बसची समोरासमोर धडक ; 21 जखमी

भर जहाँगीर येथील युवक पवन आणि त्याच्या गावातीलच तरुणी मनिषा या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळून दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दोन्ही कुटुंबांमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला. दरम्यान, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सत्यनारायण फुके आणि रिसोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष नेमणार यांनी दोन्ही कुटुंबीयांचे मनोमिलन घडवून आणले. पवन आणि मनिषाचे लग्न जुळवून दिले. वाद घालण्यापेक्षा परस्परांमध्ये समन्वय साधणे अधिक चांगले ही भावना पटल्यामुळे दोघांच्याही कुटुंबातील सदस्यांच्या साक्षीने पवन व मनिषाचा बुधवारी पोलीस ठाण्यात विवाह लावून देण्यात आला.

Intro:प्रेमी युगुलाचे रिसोडच्या पोलीस ठाण्यात ' शुभमंगल '

वाशिम : कुटूंबाचा , समाजाचा विरोध झुगारून एकमेकांसोबत आयूष्यभर राहण्याचा आणाभाका घेतलेल्या येथील एका प्रेमीयुगुलाचे रिसोड येथील पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी व दोघांच्या कुटूंबातील सदस्यांच्या साक्षीने विवाह लावून देण्यात आला..

भर जहाँगीर येथील युवक पवन रमेश कांबळे आणि गावातील युवती मनिषा संतोष मानवतकर या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळून दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला

मात्र दोन्ही कुटूंबांमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला .दरम्यान तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सत्यनारायण फुके आणि रिसोड पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक संतोष नेमणार यांनी दोन्ही कुटूंबांचे मनोमिलन घडवून आणत पवन आणि मनिषाचे लग्न जुळवून दिले . वाद घालण्यापेक्षा परस्परांमध्ये समन्वय साधणे अधिक चांगले ही भावना पटल्यामुळे दोघांच्याही कुटूंबातील सदस्यांच्या साक्षीने पवन व मनिषाचा बुधवारी पोलिस ठाण्यात विवाह लावून देण्यात आला . Body:प्रेमी युगुलाचे रिसोडच्या पोलीस ठाण्यात ' शुभमंगल 'Conclusion:प्रेमी युगुलाचे रिसोडच्या पोलीस ठाण्यात ' शुभमंगल '
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.