ETV Bharat / state

महाराष्ट्र भ्रमणासाठी निघालेल्या कमलेशचे वाशिममध्ये स्वागत

महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाचा वारसा लाभलेल्या स्थळांना भेट देण्यासाठी "महाराष्ट्र राइड" या अभियानांतर्गत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी अडगाव (नाशिक) येथून दुचाकी वाहन यात्रेला प्रारंभ करणाऱ्या कमलेश बाफना या तरुणाचे वाशिम नगरीत आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले.

कमलेश बाफना
कमलेश बाफना
author img

By

Published : Feb 27, 2021, 8:42 PM IST

वाशिम - महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाचा वारसा लाभलेल्या स्थळांना भेट देण्यासाठी "महाराष्ट्र राइड" या अभियानांतर्गत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी अडगाव (नाशिक) येथून दुचाकी वाहन यात्रेला प्रारंभ करणाऱ्या कमलेश बाफना या तरुणाचे वाशिम नगरीत आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले.

मूळ व्यावसायिक असलेल्या कमलेश बाफना यांना बालपणापासूनच भ्रमंतीची आवड आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक पर्यटनस्थळे तसेच वैभवशाली व सांस्कृतिक वारसा लाभलेलेले आपले महाराष्ट्र राज्य जवळून पाहण्याची ओढ बालपणापासून मनात होती.मात्र बालवय, शिक्षण, रोजगार आदी कारणामुळे ती शक्य झाली नाही. त्यामुळे आता एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यवसाय करताना बालवयातील स्वप्न पूर्ण करण्याची ही संधी लाभली आहे. असे यावेळी बाफना यांनी सांगितले.

आतापर्यंत 14 जिल्ह्यांचा प्रवास

या दौऱ्यामध्ये राज्यातील सर्व 36 जिल्ह्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांची आपण पाहणी करून, माहिती संकलीत करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यापैकी वाशिम हा 14 वा जिल्हा आहे. आतापर्यंत नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगांव खानदेश, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व यवतमाळ या जिल्ह्यातून 4300 किलोमीटरचा प्रवास केल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित 22 जिल्ह्यांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी आणखी दोन महिने लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्र भ्रमणासाठी निघालेल्या कमलेशचे वाशिममध्ये स्वागत

दररोज 150 किलोमीटरचा प्रवास

ज्या ठिकाणी मुक्कामाची कुठलीही व्यवस्था उपलब्ध नाही, अशा वेळी त्या गावातील मंदिर अथवा पेट्रोल पंप आदी सुरक्षित ठिकाणी स्वतःजवळील टेंट उभारून मुक्काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिनी सुरू झालेल्या "महाराष्ट्र राईड" या अभियानांतर्गत आपण दररोज १५० किलोमीटरचा प्रवास करत असून, राज्यातील ऐतिहासिक स्थळे, पर्यटन स्थळे व प्राचीन मंदिरे यांना भेट देत असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.