वाशिम - २१ जून हा जागतिक योगा दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. वेगवेगळे योगाचे प्रशिक्षक लोकांना प्रशिक्षण देत असतात. तसेच वाशिम शहरातील दीपा वानखेडे ह्या योगाच प्रशिक्षण देतात. मात्र गेल्या वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रशिक्षण केंद्र बंद करण्यात आली आहेत. त्यामुळं दीपा वानखेडे यांनी ऑनलाइन प्रशिक्षण सुरू केले असून, देशभरात तर ऑनलाइन प्रशिक्षण दिले जातेच, मात्र त्यांच्या प्रशिक्षणाची लिंक विदेशात ही पोहचली आहे. जपान, कोलिफोर्निया, यूएसए, न्युजर्सीसह चार देशातील नागरिक या ऑनलाइन पध्दतीने योगाच प्रशिक्षण घेत असल्याचे योगा शिक्षिका दीपा वानखेडे यांनी सांगितले.
सोशल मीडियाव्दारे योग प्राणायामाचे नागरिकांना धडे
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोणीही घराबाहेर पडत नव्हते. अशातच वेळेचा योग्य उपयोग व्हावा. याकरीता पतंजली परिवार तथा महिला पतंजली योग समितीच्या जिल्हा प्रभारी दीपा रवी वानखडे यांनी रोगप्रतिकारशक्ती वाढावी म्हणून सोशल मीडियाव्दारे योग प्राणायामाचे धडे नागरिकांना दिले. त्यांचे हे कार्य आजही अविरत सुरु आहे. काेराेना काळात योग करुन प्रतिकारशक्ती वाढविणे, आयुर्वेदाचा आधार घेऊन शरिराचे, इंद्रियाचे, सर्वप्रकारच्या रोग व्याधीपासून रक्षण करणे यासाठी ऑनलाईन पध्दतीने योगाच प्रशिक्षण सुरू केले. वातावरण व पर्यावरण शुध्दी करुन स्वच्छतेचा संदेश पोहोचविणे या अनुषंगाने वाशिम येथील पतंजली परिवार, महिला पतंजली योग समितीच्या पुढाकाराने दीपा वानखडे यांनी उपक्रम सुरु केला आहे. पतंजली योग साधना या व्हॉट्सअॅप ग्रुपव्दारे त्या दररोज व्हिडीओव्दारे योगा, प्राणायमाचे प्रकार, त्याबाबत संपूर्ण माहिती दिली. व त्याचे फायदे ग्रुप सदस्यांना त्यांनी पटवून दिले. त्यांच्या कार्याची विविध सामाजिक संघटनांनीही दखल घेतली आहे. भारत स्वाभिमान पतंजली योग समिती, वाशिमचे कोषाध्यक्ष व आजीवन सदस्य पतंजली योगपीठ, हरिव्दारचे डॉ. भगवंतराव वानखडे, संघटनमंत्री शंकर उजळे व पंतजली परिवाराच्या याेग्य मार्गदर्शनामुळे हे शक्य झाल्याचे दीपा वानखडे सांगतात.
बेटी बचाओ फांऊडेशनतर्फे ‘राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार’
याेगतज्ञ दीपा यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ३ मार्च राेजी बेटी बचाओ फांऊडेशनतर्फे ‘राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार’ देण्यात आला. त्यांना २०१९ मध्ये नि:शुल्क याेगसेवेसाठी व्हाईट स्पेस संस्था, पुणेकडून २०२० मध्ये कवी डाॅ.विठ्ठल वाघ यांच्या हस्ते ‘युथ आयकाॅन पुरस्कार’ यासह विविध सामाजिक संघटनांचे पुरस्कार मिळाले आहेत. विशेष म्हणजे आयुष मंत्रालय भारत सरकारच्यावतीने घेण्यात आलेल्या जागतिक पातळीवरील याेग शिक्षक व याेग मूल्यांकन परिक्षाही त्या उत्तीर्ण आहेत.
हेही वाचा- आंतरराष्ट्रीय योग दिन : खासदार अन् आमदार राणा यांचा कुुटुंबीयांसह योगा