ETV Bharat / state

मंगरुळपीर येथे देशी कट्टा जप्त; तीन आरोपींना अटक - washim crime news

जिल्ह्यात मंगरुळपीर येथे पोलिसांनी देशी कट्ट्यासह जिवंत काडतुस जप्त केली आहेत. शहरातील व्हिडीओ चौकात पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मंगरुळपीर येथे देशी कट्टा जप्त
author img

By

Published : Aug 7, 2019, 9:32 AM IST

वाशिम- जिल्ह्यात मंगरुळपीर येथे पोलिसांनी देशी कट्ट्यासह जिवंत काडतुस जप्त केली आहेत. शहरातील व्हिडीओ चौकात पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मंगरुळपीर येथे देशी कट्टा जप्त

मंगरुळपीर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. शहरतील व्हिडीओ चौकात तिघेजण संशयितरित्या पोलिसांना आढळून आले. त्यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडून एक देशी कट्टा व एक जिवंत काडतुस किंमत 70 हजार तसेच एक मोटारसायकल (एम एच ३७ वाय ४३४६) किंमत ४० हजार रुपये असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या घटनेत आरोपी आशिष गजानन इंगोले (वय २७) रा. मोहरी, केतन केशव इंगोले (वय २३) रा. मोहरी, आकाश भीमराव वाघमारे (वय २१) रा. रहीत या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर एक आरोपी परवेज अन्सारी रा. नालासोपारा हा फरार असल्याचे समजते.

ही कारवाई ठाणेदार विनोद दिघोरे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मंजुषा मोरे, हवालदार अंबादास राठोड, हवालदार सुनील गंडाईत, उमेश ठाकरे, संदिप खडसे यांनी केली. आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले आहे. न्यायालयाने आरोपींना ९ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Intro:मंगरुळपीर येथे देशी कट्टा जप्त,तीन आरोपींना अटक

वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरातील व्हिडीओ चौकात पोलिसांनी ता ५ रोजी देशी कट्ट्यासह जिवंत काडतुस जप्त केले असून तीन आरोपीना अटक करण्यात आली आहे.

मंगरुळपिर येथील पोहेकॉ अंबादास राठोड यांनी तक्रार दिली की,ता ५ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून शहरतील व्हिडीओ चौकातून आरोपी आशिष गजानन इंगोले वय २७,रा मोहरी,केतन केशव इंगोले वय २३,रा मोहरी,आकाश भीमराव वाघमारे वय २१ रा रहीत यांना ताब्यात घेऊन यांचेकडून पंचासमक्ष एक देशी कट्टा व एक जिवंत काडतुस किंमत ७० हजार रुपये तसेच एक मोटारसायकल क्र एम एच ३७ वाय ४३४६ किंमत ४० हजार रुपये असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा माल जप्त केला.

तसेच अन्य एक आरोपी परवेज अन्सारी रा नालासोपारा हा फरार असल्याचे समजते.सदरची कारवाई ठाणेदार विनोद दिघोरे यांचे मार्गदर्शनात पीएसआय मंजुषा मोरे,पोहेकॉ अंबादास राठोड,पोकॉ सुनील गंडाईत,उमेश ठाकरे,संदिप खडसे यांनी केली.तसेच आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ९ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.Body:फीड : सोबत आहेConclusion:फीड सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.