ETV Bharat / state

मान्सून काळातील आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज रहा - पालकमंत्री शंभूराज देसाई

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यात आवश्यक आरोग्य सुविधा सज्ज ठेवण्यावर भर द्यावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. मान्सूनपूर्व तयारी व जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. त्यांनी यावेळी मान्सूनपूर्व तयारी, जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची सद्यस्थिती, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम, लहान मुलांसाठी तयार करण्यात येत असलेल्या स्वतंत्र वार्डची सद्यस्थिती आदी बाबींचा आढावा घेतला.

शंभूराज देसाई
शंभूराज देसाई
author img

By

Published : Jun 10, 2021, 9:20 AM IST

वाशिम : आगामी मान्सून काळात जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास, त्याचे निवारण करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी सज्ज रहावे. या काळात सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यात आवश्यक आरोग्य सुविधा सज्ज ठेवण्यावर भर द्यावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. मान्सूनपूर्व तयारी व जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

पालकमंत्री देसाई यांनी यावेळी मान्सूनपूर्व तयारी, जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची सद्यस्थिती, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम, लहान मुलांसाठी तयार करण्यात येत असलेल्या स्वतंत्र वार्डची सद्यस्थिती आदी बाबींचा आढावा घेतला.

पालकमंत्री देसाई म्हणाले, मान्सून काळात ग्रामीण भागातील काही रस्त्यांवरील पूल पाण्याखाली जावून वाहतुकीला अडथळा निर्माण होवू शकतो. या परिस्थितीतही नागरिक पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते, त्यामुळे या अनुषंगाने विशेष खबरदारी घ्यावी व अशा मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी. धोकादायक इमारतींमुळे जीवितहानी होवू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास महावितरणने त्वरित कार्यवाही करून सदर वीज पुरवठा पूर्ववत करावा. तलाव, बंधाऱ्यातील पाणी शेतीमध्ये जावून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग कमी होत असून ही अतिशय दिलासादायक बाब आहे. मात्र, तरीही संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी सज्ज होणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेवर भर देवून ४५ वर्षांवरील व्यक्तींचे जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत. लोकांच्या मनात काही गैरसमज असल्यास ते दूर करण्यासाठी गावपातळीवर जनजागृती मोहीम हाती घ्यावी. तलाठी, ग्रामसेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने घरोघरी जावून लोकांना लसीकरणाचे महत्व पटवून द्यावे, अशा सूचना पालकमंत्री देसाई यांनी केल्या. तसेच वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय, कारंजा उपजिल्हा रूग्णालयासह सर्व ग्रामीण रुग्णालय स्तरावर कोरोना बाधित लहान मुलांसाठी स्वतंत्र वार्ड सुरु करण्यासाठी नियोजन करावे, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.