ETV Bharat / state

'बाहेर जिल्ह्यातून आलेल्या मजुरांची काळजी घ्या' - shambhuraje desai

लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर जिल्ह्याबाहेर तसेच परराज्यात असलेले मजूर वाशिममध्ये परतले आहेत. या मजुरांची काळजी घ्या, त्यांची आरोग्य तपासणी करून योग्य मार्गदर्शन करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या आहेत.

shambhuraje desai video conference
'बाहेर जिल्ह्यातून आलेल्या मजुरांची काळजी घ्या'
author img

By

Published : May 16, 2020, 3:14 PM IST

वाशिम - लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर जिल्ह्याबाहेर तसेच परराज्यात असलेले मजूर वाशिममध्ये परतले आहेत. या मजुरांची काळजी घ्या, त्यांची आरोग्य तपासणी करून योग्य मार्गदर्शन करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

'बाहेर जिल्ह्यातून आलेल्या मजुरांची काळजी घ्या'
जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खासदार भावना गवळी, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झाले होते. मुंबई, पुणेसह इतर जिल्ह्यातून परतलेल्या मजुरांची संख्या मोठी असून त्यांना गावातील प्राथमिक शाळा अथवा इतर ठिकाणी विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. ग्रामस्तरीय समितीमार्फत याबाबतचे नियोजन सुरू असून सर्व गराजांची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच जिल्ह्याबाहेर अडकलेल्या मजुरांची जिल्हानिहाय यादी सादर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. संबंधित जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करून या मजुरांना परत आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्ह्यात ‘सीसीआय’मार्फत सुरु असलेली कापूस खरेदी व ‘नाफेड’मार्फत करण्यात येत असलेली चना, तूर खरेदी अधिक गतीने होणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या सर्वच शेतकऱ्यांचा कापूस व तूर खरेदीची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत पणन मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची देसाई यांनी माहिती दिली. यापूर्वीच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये होमगार्डच्या नेमणुकीचा प्रश्न उपस्थित झाला होता. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर संबंधित प्रश्न निकाली निघाल्याचे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.