ETV Bharat / state

हळदीचा हंगाम; भर उन्हात शेतकरी 'अशी' काढतो कढईतून हळद. . - हंगाम

वाशिम जिल्ह्यातील ८९५ हेक्टरवर हळदीची लागवड करण्यात आली. सध्या हळदीचा हंगाम सुरू असून सेतकऱ्यांची हळद काढण्याची लगबग सुरू आहे.

हळद कढईतून काढताना शेतकरी
author img

By

Published : Mar 25, 2019, 10:40 AM IST

Updated : Mar 25, 2019, 3:32 PM IST

वाशिम - उत्पादन खर्च वाढून उत्पन्नात होणाऱ्या घटीने शेतकरी मोडकळीस आला आहे. त्यामुळे शेतकरी हळदीच्या नगदी पिकाकडे वळला आहे. सध्या वाशिम जिल्ह्यात हळदीचा हंगास जोरात सुरू असून शेतकरी भर उन्हात हळकुंडाला कढईतून काढत आहेत.

हळद कढईतून काढताना शेतकरी

हळद काढताना हळदीची मोड आणि बीज वेगळे काढतात. त्यानंतर ती शिजवण्याकरता खळ्यावर नेली जाते. यासाठी गावाबाहेर एका शेतात उकाडा लावण्यात येतो. उकाड्यावर मोठी चूल असून त्यावर एक लोखंडी कढई असते. यामध्ये १/३ पाणी टाकून हळदीची मोड टाकली जाते. एकावेळी ८ क्विंटल हळद शिजविण्याची क्षमता या कढईची आहे.

कढईमध्ये टाकलेल्या हळदीच्या मोडीवर पाणी टाकले जाते. हळदीवर गोणपाट किंवा तरट झाकून हळदीचा पालापाचोळा टाकतात. १५ ते २० मिनीट हळद उकळण्याचा कार्यक्रम होऊन वाफ बाहेर येताच तो उकाडा बंद करुन हळद खळ्यावर टाकली जाते. शिजविलेली हळद १५ ते २० दिवस वाळू घातली जाते व ती बाजारात विकल्या जाते.

जिल्ह्यातील ८९५ हेक्टरवर यावर्षी हळद लागवड झाली आहे. सध्या हळदीचा हंगाम जोरात सुरू आहे. मात्र काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने कढईत उकळून प्रक्रिया करीत आहेत. त्यामुळे मजूर जास्त लागतात. वाशिम येथील शेतकरी सागर रावले यांनी भाड्याने बॉयलर आणून हळदीची प्रक्रिया सुरू केली आहे. बॉयलरमधून चांगल्या प्रतीची हळद मिळत असून खर्च कमी येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बॉयलरचा वापर केल्यास याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती रावले यांनी दिली. दरम्यान शेतकऱ्यांना हळदीचे पीक तारणार असल्याची आशा लागून आहे.

Intro:अँकर:- दिवसेंदिवस वाढता उत्पादन खर्च आणि सोयाबीनच्या उतारयात होत असलेली घट यामुळं, वाशिम जिल्ह्यातील शेतकरी नगद पीक म्हणून हळद पिकाकडे वळत आहेत.यंदा जिल्ह्यात 895 हेक्टरवर हळद लागवड झाली असून सध्या हळदीचा हंगाम जोरात सुरू आहे. मात्र काही शेतकरी पारंपारिक पध्दतीने कढईत उकळून प्रक्रिया करीत आहेत.त्यामुळं मजूर जास्त लागत असल्याने वाशिम येथील शेतकरी सागर रावले यांनी भाड्यानं बॉयलर आणून हळदीची प्रक्रिया सुरू केली आहे. बॉयलर मधून चांगल्या प्रतीची हळद मिळत असून खर्च कमी येत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी बॉयलर चा वापर केल्यास याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होणार आहे....
Body:Feed : सोबत जोडलेली आहेConclusion:Feed : सोबत जोडलेली आहे
Last Updated : Mar 25, 2019, 3:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.