वाशिम - राज्य सरकारचा पायलट प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले आहे. हा समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे. मात्र, सध्या महामार्गासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. या वाहतुकीदरम्यान प्रचंड धुळ उडते. एका शेतकऱ्यांच्या शेतातील पीक या धुळीमुळे धोक्यात आले आहे.
जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात यंदा दुष्काळसदृश परिस्थिती आहे. मात्र, या परिस्थितीत अनसिंग येथील सुभाष आंधळे यांच्याकडे पाणी उपलब्ध असल्याने त्यांनी दीड एकर चवळी आणि एक एकर भेंडी लागवड केली आहे. मात्र महामार्गाचे काम सुरू असल्याने शेताजवळून वाहतूक सुरू असल्याने त्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे होत असलेल्या नुकसानीचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे. तसे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.