वाशिम - जिल्ह्यात काल (मंगळवार) रात्री अवकाळी पावसासोबत झालेल्या गारपिटीने काढणीला आलेला कांदा बीज, आंबा, व हळदीच्या पीकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत अधीकच भर पडली आहे. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून सरकारने भरीव मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
वाशिम जिल्ह्यातील काही भागात कमी-अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर शिरपूर येथे वादळवार्यासह अवकाळी पाऊस झाल्याने आंबा, कांदाबीज, हळद उत्पादक शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हळद पीक घेतले जाते. हळद पीक काढणीनंतर ते सुकविण्याकरिता शेतात जमिनीवर पसरवले जाते. मात्र, काल रात्री अचानक झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या सर्व शेतमालांचे प्रचंड नुकसान झाले. या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शासकीय मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.