वाशिम - यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील सेनेचे उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचारार्थ आज वाशिमध्ये एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर जोरदार टीका केली. तसेच कोंबड्याचे उदाहरण देत राहुल गांधींचीही खिल्ली उडवली.
मुख्यमंत्री म्हणाले, सर्जिकल स्ट्राईकनंतर काँग्रेसने सैन्याला पुरावा मागितला. त्यांचा भारतीय सैन्यावर विश्वास नाही. आधी जर माहीत असते तर काँग्रेस नेत्याला विमानाला बांधून पाकिस्तानला पाठवले असते. जाहीरनाम्यात त्यांनी जम्मू काश्मीरमधील सेनेचा अधिकार काढून घेऊ आणि १२४-A हे कलम रद्द करू, असा उल्लेख केला आहे. त्यामुळे काँग्रेस हा पाकिस्तान धार्जिनी असून, अशा लोकांच्या हातात सत्ता देणार का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी देशाचे हात बळकट करण्यासाठी मोदींच्या हातात सत्ता द्या, असे आवाहन वाशिममधील जनतेला केले.