वाशिम - शहरी भागांमध्ये कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शहरातील नोकरदार वर्गाने गावी जाण्याचा पर्याय जवळ केला आहे. यामुळे गावांतील नागरिकांना कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. अनेक गावांना गावातील प्रवेशद्वार आणि रस्ते बंद केले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील वापटी कुपटी या गावानेही गावातील मार्ग बंद केले आहेत.
गावातून बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांत काटेरी झाडे आणि बैल गाड्या आडव्या लावून गावात प्रवेश बंद केली आहे. ग्रामस्थ गावाकडे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांकडे लक्ष ठेवून आहेत. बाहेरच्या नागरिकांना गावात येण्यास पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वापटी कुपटी गावातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही खबरदारी घेण्यात आली आहे, असे ग्रामस्थांचे म्हणने आहे.
20 एप्रिलपासून महानगरातून अनेक नोकरदार आणि मजूर गावाकडे धाव घेत आहेत. यामुळे गावातील नागरिकांनी गावात येणारे मार्ग बंद केले आहेत.