वाशिम- कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सोडून बाकी सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, वाशिम तालुक्यातील काकडदाती परिसरात शासनाच्या आदेशाची पायमल्ली झाल्याचे दिसून आहे. परिसरातील किंग बार अॅण्ड रेस्टॉरंट उघडे होते. मात्र, पोलिसांनी बार चालकावर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
संचारबंदीच्या काळात परवानगी नसतानाही काकडदाती परिसरातील किंग बार अॅण्ड रेस्टॉरंट सुरू असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून स्थानिक गुन्हे व ग्रामीण पोलिसांनी बारवर छापा टाकून दोन दुचाकींसह ४ लाख ५७ हजार ६७७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचबरोबर, बार मालकासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा- संचारबंदीत आयडीयाची कल्पना; गावाकडे जाण्यासाठी चक्क अँम्बुलन्सचा वापर, पोलिसांनी केला 'भांडाफोड'