वाशिम - जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून कोविड-19 या संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले असून, तब्बल एक हजारांवर रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी 21 फेब्रुवारीपासून सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सर्व दुकाने, आस्थापना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तर, आज सायंकाळी पाच ते सोमवार सकाळी 9 वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील भवानी नगर येथील १, कोल्हटकरवाडी येथील २, देवपेठ येथील १, मंत्री पार्क येथील २, जैन कॉलनी येथील १, आययुडीपी कॉलनी येथील ३, शिवाजी नगर येथील २, पाटणी ले-आऊट येथील १, सिंधी कॅम्प येथील १, गुप्ता ले-आऊट येथील १, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरातील १, वारा जहांगीर येथील १, तामसी येथील १, ब्रह्मा येथील २, भटउमरा येथील १, शेलू येथील २, रिसोड शहरातील आंबेडकर नगर येथील १, आसनगल्ली येथील १, देशमुख गल्ली येथील २, मुल्लागल्ली येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, एकलासपूर येथील १, गणेशपूर येथील १, वाकद येथील १, घोटा येथील १, मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील १, भौरद येथील १, मानोरा शहरातील मेन रोड परिसरातील १, इतर ठिकाणचा १, नाईक नगर येथील २, साखरडोह येथील १, गळमगाव येथील १, हिवरा बु. येथील १, असोला खु. येथील २, वाटोद येथील १, मंगरूळपीर शहरातील हुडको कॉलनी येथील २, बाबरे कॉलनी येथील १, बायपास परिसरातील ३, अकोला रोड परिसरातील २, राधाकृष्ण नगरी येथील १, तपोवन येथील १, पेडगाव येथील ४, शेंदूरजना येथील १, वनोजा येथील २, मोहरी येथील ४, सावरगाव येथील २, शहापूर येथील ४, मसोला येथील १, कारंजा शहरातील पहाडपुरा येथील १, नेहरू चौक येथील १, मेन रोड परिसरातील १, वाल्मिकी नगर येथील २, सिंधी कॅम्प येथील २, गणपती नगर येथील १, महावीर कॉलनी येथील १, नगरपरिषद कॉलनी येथील १, गुरुकृपा हॉटेल जवळील १, शिक्षक कॉलनी येथील ३, सहारा कॉलनी येथील १, आई मंगल कार्यालय जवळील १, बाबर कॉलनी येथील १, दत्त कॉलनी येथील १, गुरु मंदिर रोड परिसरातील २, गौतम नगर येथील १, संतोषी माता कॉलनी येथील १, एसबीआय रोड परिसरातील १, जुना सरकारी दवाखाना परिसरातील १, इंगोले ले-आऊट परिसरातील १, माळीपुरा येथील १, दामिनी नगर येथील १, सुदर्शन कॉलनी येथील १, बजरंग पेठ येथील १, प्रियदर्शनी कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, खडी धामणी येथील १, पोहा येथील १, वाढवी येथील २, बेलमंडल येथील १, उंबर्डा येथील १, शहा येथील ३, हिवरा लाहे येथील ५, आखतवाडा येथील १, पिंपरी मोडक येथील १, चवसाळा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील १ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तसेच, ४३ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.