वाशिम - कोरोनाने देशात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभाग युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. अनेक नागरिकही आपाल्यापरिने या कामासाठी मदत करत आहेत. वाशिम जिल्ह्यातील नेतंसा येथील पोलीस मित्र मंडळही चोवीस तास चेकपोस्ट चालवून पोलिसांना मदत करत आहे.
वाशिम जिल्ह्यात एकच कोरोना बाधित रुग्ण असल्याने 20 एप्रिलपासून जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथील केले. त्यामुळे पोलीस सध्या गावात येत नाहीत. त्यांच्या जागी नेतंसा येथील पोलीस मित्र मंडळ 24 तास सेवा देत आहे. बाहेरुन गावात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केल्याशिवाय त्याला प्रवेश दिला जात नाही.
गावात आल्यानंतर या चेकपोस्टवर प्राथमिक आरोग्य चाचणी केल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या चेकपोस्टची चांगली मदत होत आहे.