ETV Bharat / state

14 किलोगांजासह एक लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त; वाशिम मंगरुळपीर पोलिसांची कारवाई

author img

By

Published : Sep 26, 2020, 2:48 AM IST

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, 14 किलो गांजासह एक लाख 68 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई, मंगरुळपीर पोलिसांनी केली.

accused arrested
आरोपीसह पोलीस.

वाशिम - चार चाकी वाहनातून 14 किलो गांजासह एक लाख 68 हजारांचा मुद्देमालही पोलिसांनी ताब्यात घेण्यात आला. तसेच एकास जेरबंद करण्यात आले आहे. मंगरुळपीर पोलिसांनी ही कारवाई केली.

मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गावर एका चार चाकी गाडीत अवैध गांजाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगरुळपीर पोलिसांनी सापळा रचला. मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा गावाजवळ चेक पोस्टवर (एमएच-29-एएच-9786) या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये 14 किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी या गांजासह एक लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आरोपींची गाडीही ताब्यात घेण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात गांजा तस्करीचे अनेक प्रकरण समोर येत आहेत. तसेच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी होत असल्याचे बोलले जात आहे. याकडे विशेष लक्ष देऊन पोलीस प्रशासनाने ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.