वाशिम - जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात दाखल १२ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने ७ मे रोजी तपासणीसाठी अकोला येथील वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज (८ मे) प्राप्त झाले आहेत. यापैकी ११ व्यक्तींचे अहवाल नकारात्मक आले आहेत. एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
कोरोनाबाधित व्यक्ती ट्रक ड्रायव्हर असून तो यापूर्वी मृत्यू पावलेल्या ट्रक क्लिनरच्या नजीकच्या संपर्कात आला होता. मृत क्लिनरच्या संपर्कात आलेल्या वाशिम जिल्ह्यातील ४ व्यक्तींचे अहवाल नकारात्मक आले आहेत. कोविड-१९ बाधित ड्रायव्हर हा वाशिम जिल्ह्याचा रहिवासी नसून त्याचे जिल्ह्यात नजीकचे संपर्क नाहीत. 'सारी'चे ३ रुग्ण व रेड झोनमधून आलेल्या, अंगात ताप असलेल्या ४ व्यक्तींचे अहवालही नकारात्मक आले आहेत.
वाशिममध्ये १२ पैकी ११ अहवाल 'निगेटिव्ह', एकजण कोरोनाबाधित
वाशिममध्ये १२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी अकोला येथील वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज (८ मे) प्राप्त झाले आहेत. यापैकी ११ व्यक्तींचे अहवाल नकारात्मक आले असून, एकाचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.