वर्धा - कोरोना संसर्गामुळे प्रशासन सतर्क झाले असून जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. पण, इतरत्र वाढती कोरोनाच्या रुग्णाची संख्या पाहता, ग्रामीण भागात शिरकाव झाल्यास उपलब्ध प्राथमिक सोयी सुविधांचा प्रशासनाच्या वतीने आढावा घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरिता गाखरे यांनी कारंजा तालुक्यासह अनेक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांना भेटी देऊन परिस्थिती जाणून घेतली.
Coronavirus : जिल्हा परिषद अध्यक्षांनी घेतला आरोग्य केंद्राचा आढावा, रुग्णालयाची केली पाहणी - आरोग्य केंद्र
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरिता गाखरे यांनी कारंजा तालुक्यासह अनेक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांना भेट दिली. यावेळी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना देत हात स्वच्छ धुणे यासारख्या माहितीचा प्रचार, प्रसार करण्याचेही त्यांनी यावेळी नागरिकांना सांगितले.
रुग्णालयाची पाहणी करताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरिता गाखरे