ETV Bharat / state

कर्जमाफी मिळणार का ? जाणून घ्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया..

ठाकरे सरकारच्या कर्जमाफीचे निकष स्पष्ट झाले नसले तरी यात अटी राहिल्यास शेतकरी पुन्हा कर्जमाफीपासून वंचित राहिल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबद्दल 'ईटीव्ही भारत' चे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कर्जमाफीबद्दल त्यांचे मत जाणून घेतले.

wardha
शेतकरी
author img

By

Published : Dec 29, 2019, 4:48 AM IST

वर्धा- महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकार अस्तित्वात आले. पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. यात फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या कर्जमाफीचा लाभ काहींना मिळाला. तर काहींना अद्याप नाही. त्यात ठाकरे सरकारच्या कर्जमाफीचे निकष स्पष्ट झाले नसले तरी यात अटी राहिल्यास शेतकरी पुन्हा कर्जमाफीपासून वंचित राहिल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबद्दल 'ईटीव्ही भारत' चे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कर्जमाफीबद्दल त्यांचे मत जाणून घेतले.

कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांची प्रतिक्रिया घेताना 'ईटीव्ही भारत' चे प्रतिनिधी पराग ढोबाळे

सरसकट कर्जमाफी करा

सेलू तालुक्यातील रमेश वाघमारे यांना फडणवीस सरकारच्या काळात कर्जमाफी मिळाली होती. असे असले तरी त्यांच्यावर अजून कर्ज आहे. त्यामुळे कर्जमुक्त होण्यासाठी दोन लाखांऐवजी सरसकट कर्जमाफी करावी, अशी वाघमारे यांची मागणी आहे.

निकष न लावता जाहीर कर्जमाफी करावी

राजेश ज्ञानेशवर झाडे यांना फडणवीस सरकारच्या काळात कर्जमाफी मिळाल्याचा मॅसेज आला. त्यासाठी झाडे यांनी बँकेत चकरा मारल्या. मात्र त्यांनी कर्जाची उचल ही 1 एप्रिल 2017 मध्ये केली असल्याने त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. यामुळे कुठलेही निकष न लावता जाहीर नाम्यात सांगितल्या प्रमाणे कर्जमाफी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. राजेश झाडे यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेतीवर 1 लाख 27 हजार आणि त्यांच्या नावे असलेल्या 2 एकर शेतीवर 40 हजाराचे यंदाचे कर्ज आहे. यंदाही कर्जमाफीचा लाभ मिळेल यावर त्यांना शंका आहे.

दीर्घकालीन शेती कर्जधारकांचा विचार कारावा

विठ्ठल वानोडे हे शेडनेट पॉलिहाऊस धारक शेतकरी आहे. त्यांनी हायटेक शेती करण्यासाठी कर्ज घेतले. मात्र, हवामान योग्य न ठरल्याने ही शेती पूर्णतः उध्वस्त झाली. आज वानोडे यांच्यावर कर्जाचा डोंगर आहे व शासनाने सरसकट कर्जमाफी करावी अशी त्यांची इच्छा आहे. पण, ही कर्जमाफी केवळ शेती पिकांसाठी न करता त्यात दीर्घकालीन शेती कर्जधारकांचा सुद्धा विचार करावा. जेणेकरून कर्जाचे डोंगर थोडे का होईना कमी होईल आणि कर्जमाफीचा लाभ मिळू द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.

ठाकरे सरकारच्या काळात कर्जमाफी मिळण्याची आशा कमी

सेलू तालुक्यातील रेहकी येथील शेतकरी सचिन धानकुटे यांच्या घरातील दोन खात्यांवर कर्ज आहे. मात्र, फडणवीस सरकारच्या काळातसुद्धा काही अटी शर्तीमुळे त्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागेल. यावेळीसुद्धा उद्धव ठाकरे सरकारच्या काळात कर्जमाफी मिळू शकेल, अशी अशा नसल्याचे ते म्हणाले. त्यांच्या घरातील दोन खात्यांवर 1 लाख 60 हजाराचे कर्ज आहे.

कर्जमाफीची घोषणा झाली. शासन निर्णय निघाला. पण प्रत्यक्षात निकष आणि अटी नसणार आणि सर्वांना 2 लाखांपर्यंत असलेल्या कर्जमाफीचा लाभ मिळेल, असे सांगण्यात येत होते. पण, लाभार्थी शेतकऱ्यांना अटी शर्ती लागणार की नाही, काय निकष असतील हे जो पर्यंत स्पष्ट होणार नाही तो पर्यंत कर्जमाफी बद्दलचा हा संभ्रम कायम असणार आहे हे मात्र नक्की.

हेही वाचा-

Intro: mh_war_selu_chaupal_karjmafi_7204321

कर्जमाफी मिळणार का?काय वाटतंय शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या घोषणेनंतर

वर्धा- महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकार अस्तित्वात आले. पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. यात फडणवीस सरकारच्या काळात झालेली कर्जमाफीचा लाभ काहींना मिळाला तर काहींना अद्याप नाही. यामुळे ठाकरे सरकारची कर्जमाफीचे निकष स्पष्ट झाले नसले तरी यात अटी राहिल्यास पुन्हा वंचित राहिल असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबद्दल ईटीव्हीचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

वर्ध्यातील सेलू तालुक्यातील सेलू तालुक्यातील रमेश वाघमारे यांना फडणवीस सरकारच्या काळात कर्जमाफी मिळाली. असे असले तरी त्यांच्यावर अजून कर्ज आहे. यामुळे हे कर्ज मुक्त होण्यासाठी दोन लाखा ऐवजी सरसकट कर्जमाफी म्हटली त्याच प्रमाणे सातबारा कोरा करावा अशी मागणी होत आहे.

केवळ एका दिवासाच्या राजेश ज्ञानेशवर झाडे यांना फडणवीस सरकारच्या काळात कर्जमाफीचा मिळाल्याचा मॅसेज आला. मात्र प्रत्यक्षात बँकेत जाऊन चकरा मारून सुद्धा त्यानी कर्जाची उचल ही 1 एप्रिल 2017 मध्ये केली असल्याने त्यांना या कर्जमाफीची लाभ मिळाला नाही. यामुळे कुठलेही निकष न लावता जाहीर नाम्यात सांगितल्या प्रमाणे कर्जमाफी करावी अशी आशा ते व्यक्त करत आहे. राजेश झाडे यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेतीवर 1लाख 27 हजार आणि त्यांच्या नावे असलेल्या 2 एकर शेतीवर 40 हजाराचे यंदाचे कर्ज आहे. यंदाही कर्जमाफीचा लाभ मिळेल यात त्यांना शंका आहे

विठ्ठल वानोडे हे शेडनेट पॉलिहाऊस धारक शेतकरी आहे. त्यांनी हायटेक शेती करण्यासाठी बकर्ज घेतले. मात्र हवामान योग्य न ठरल्याने पूर्णतः उध्वस्त झाले. आज कर्जाचा डोंगर असतांना यात सरसकट कर्जमाफी करावी. पण ही कर्जमाफी केवळ शेती पिकासाठी न करता दीर्घकालीन शेती कर्जधारकाना सुद्धा विचार करावा. जेणेकरून कर्जाचे डोंगर थोडे का होईना या कर्जमाफीचा लाभ मिळू द्यावा अशी मागणी केली जात आहे.

सेलू तालुज्यातील रेहकी येथील शेतकरी सचिन धानकुटे यांच्या घरातील दोन खात्यावर कर्ज आहे. मात्र फडणवीस सरकारच्या काळात सुद्धा काहीच अटी शर्तीमुळे कर्ममाफीपासून वंचित राहावे लागेल. यावेळी सुद्धा उद्धव ठाकरे सरकारच्या काळात कर्जमाफी मिळू शकेल अशी अशा नसल्याचे ते बोलून दाखवतात. त्यांच्या घरातील दोन खात्यावर एक लाख 60 हजाराचे कर्ज आहे.

कर्जमाफीची घोषणा झाली. शासन निर्णय निघाला. पण प्रत्यक्षात निकष आणि अटी नसणार इतर सरसकट सर्वाना 2 लाखापर्यंत असलेल्या कर्जमाफीचा लाभ मिळेल असे सांगण्यात येत होते. पण लाभार्थीं शेतकऱ्यांना अटी शर्ती लागणार कीं नाही, काय निकष असतील हे स्पष्ट होणार नाही तो पर्यंत हा संभ्रम कायम असणार आहे हे मात्र नक्की.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.