वर्धा / सेवाग्राम - भारत हा कृषी प्रधान देश आहे. या देशातील शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचा भूमिका ज्यांनी कोणी घेतली आहे, त्यांचे राजकारण आणि समाजकारण कायमस्वरूपी संपल्याचा इतिहास राहिलेले आहे. दिल्लीत ज्या लोकांनी शेतकऱ्यांच्या विचारधारेला थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांची बुध्दी भ्रष्ट झाली आहे. त्यांचा नायनाट लवकर होईल, अशी टीका केंद्रातील भाजप सरकारवर शेतकऱ्यांच्या आंदोलन माध्यमातून राज्याचे पशुसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री सुनील केदार यांनी केली. ते वर्ध्यात सर्वसेवा संघाच्या अधिवेशनात आले होते. पत्रकारांशी बोलतांना त्यांनी टीकास्त्र सोडले.
आज अध्यक्षांची निवड ही गांधी विचारधारेवर, सर्वोदयी विचारधाराने झाले. यात निवड बिनविरोध झाल्याने हा पदभार स्वीकारला. विरोध असता तर मी पदभार घेतला नसता असेही म्हणाले. येत्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या मुद्द्यावर सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे म्हणाले. महिला उतपिडन, पर्यावरण, संविधान 70 वर्ष पूर्ण यासह अनेक मुद्यांवर काम करणार असल्याचे म्हणाले. तसेच दिल्लीत सुरू असणाऱ्या किसान आंदोलनाला समर्थन असल्याचे म्हणाले. सर्वांनासोबत घेऊन यावर भूमिका स्पष्ट करू असेही ते म्हणाले.
यांची होती अधिवेशनाला उपस्थिती..
या अधिवेशनाला देशभरातील विविध राज्यातील सर्वसेवा संघाचे पदाधिकारी आले होते. तसेच पालकमंत्री सुनील केदार, सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू, यासह जलपुरुष राजेंद्र सिंग, अविनाश काकडे यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते.