वर्धा - सोमवारची काळरात्र सात भावी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी कर्दनकाळ ( Wardha Car Accident ) ठरली. मित्राचा वाढदिवस साजरा करून परतीच्या प्रवासात अपघातात सातही जण जागीच ठार ( Wardha Car Accident Seven Death ) झाले. देवळीलगतच्या इसापूरजवळ माँ की रसोई या हॉटेल रेस्टॉरंटमध्ये हे विद्यार्थी थांबले होते. येथेच पवन शक्ती नामक मित्राचा वाढदिवस केक आणि जेवण करून साजरा केला. 11वाजून 40 मिनिटांच्या सुमारास परत सावंगीच्या दिशेने निघाले. पण अर्ध्या वाटेतच काळाचा घाला त्यांच्यावर झाला.
बिहारच्या पवन शक्ती नामक मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सातही जण हे यवतमाळला गेल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर ते परताना साधारण सात वाजून 10 मिनाटच्या सुमारास देवळी शहरापासून साधारण 7 किलोमीटर इसापूरजवळ माँ की रसोई या हॉटेल रेस्टॉरंटमध्ये थांबले. त्यांनी हॉटेल चालकाला चिकन बनवण्याचा ऑर्डर दिला. त्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये न बसता गार्डनमधील टेबलवर बसून केक कापला वाढदिवस साजरा केला. जेवण केले. जवळपास 2780 रुपयाचे बिल पवन शक्ती म्हणजे वाढदिवस होता त्यानेच हॉटेल चालकाला पैसे दिले. यानंतर ते 11 वाजून 38 मिनिटांच्या सुमारास येथून परत सावंगीच्या दिशेने निघाले. मात्र, कारवरील नियंत्रण सुटून काळाने त्यांच्यावर घाला घातला.
दरम्यान, ते यापूर्वी यवतमाळला गेल्याचा तर्क वितर्क लावत असून याबद्दल अजून स्पष्ट झाले नाही. निघण्याची वेळ स्पष्ट झाल्याने अपघातांची वेळ मात्र 12 वाजवून काही मिनिटांनी झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. यासोबत ते यापूर्वी कुठे गेले होते. त्यांनी मद्यपान केले होते का याचा खुलासा अजुन झाला नाही. पण गाडी भरधाव असल्याने वाहन चालकाचे नियंत्रण सुटले हे स्पष्ट होत असले तरी पोलिसांच्या तपासात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा - Mumbai Corona Update : मुंबईत बुधवारी १८५८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, १३ जणांचा मृत्यू