वर्धा : वर्धा-नागपूर मार्गावर सेलू ते वर्धा दरम्यान ट्रक चालक विश्रांतीसाठी थांबला. यात झोपून असताना अज्ञात चोरट्याने चाकूच्या धाकावर मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन पसार झाले. यात चोरट्यांना 48 तासात शोधून काढत स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना अटक केली. त्याच्याकडून 10 चोऱ्या उघडकीस आणून 1 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
वर्धा सेलू मार्गावर मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात धाक दाखवून लोकांना लुटणारी टोळी जेरबंद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे तिघेही चोरटे वर्ध्याच्या इदगाह मैदानात पाल टाकून राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यात तिघेही दूरवर गाड्या उभ्या ठेवून पाल टाकून रात्रीच्या वेळी चाकू दाखवून लूटमार करत होते. यात तपासात ट्रक चालकाला यांनीच लुटले असल्याचे पुढे आले. तिघांना ताब्यात घेऊन जेव्हा चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी सेलू, सावंगी, वर्धा शहर अशा 10 गुन्ह्याची कबुली दिली.
चोरीच्या कामासाठी चोरीच्या दुचाकींचा उपयोग....
हे चोरटे या चोरीच्या घटना करण्यासाठी दुचाकी चोरत. त्याच दुचाकींचा उपयोग जबरन चोरीच्या घटनेत उपयोगात आणत. एकदा पेट्रोल संपले की ते दुचाकी सोडून देत. झोपलेल्या ट्रक चालक वाहन चालक यांना निशाणा करून हे टोळकं काम करत. अखेर स्थानिक गुन्हे शाखेने यांच्या मुसक्या आवळल्या आहे.
पाल टाकून शहरात होते मुक्कामी.....
वर्ध्याच्या बस स्थानकाच्या मागील भागात असलेल्या इदगाह मैदानात एरवी कोणी जात नाही. याठिकाणी एक पाल टाकून हे तिघे राहत होते. यात स्थानिक गुन्हे शाखेने मूळचा हैदराबादचा शाहरुख उर्फ शाहिल उर्फ शेख रफी(19), सेलू तालुक्याच्या रेहकीचा संजिव उर्फ पाटील रामू शिंदे (20), दहेगांव रेल्वेचा राजु पवार उर्फ रेड्डी (वय 20), ताब्यात घेतले. झोपडीतून 11 मोबाईल, 2 सिझर कैची, चाकू, नगदी 1500 रूपये, 6 मोटर सायकल असा एकूण 1,80,650 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डाॅ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे, यांच्या निर्देशांप्रमाणे एपीआय महेंद्र इंगळे, पीएसआय अषिश मोरखडे, पोलीस कर्मचारी सलाम कुरेशी, निरंजन वरभे, नरेंद्र डाहाके, संतोष दरगुडे, गजानन लामसे, दिनेश बोथकर तसेच सायबर सेलवर कारवाई केली.