ETV Bharat / state

अडीच हजार पणत्यांनी उजळले 'संत केजाजी माऊली'चे प्रवेशद्वार

वर्ध्यातील सेलू घोराड येथील संत केजाजी महाराज आणि त्यांचे पुत्र नामदेव महाराजांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त घोराड नगरीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

author img

By

Published : Feb 5, 2019, 11:47 AM IST

wardha

वर्धा- वर्ध्यातील सेलू घोराड येथील संत केजाजी महाराज आणि त्यांचे पुत्र नामदेव महाराजांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त घोराड नगरीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी पारायण समाप्ती आणि संत केकाजी महाराज यांच्या ११२ व्या पुण्यतिथीनिमित्त मंदिरात तब्बल अडीच हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले. महिलांनी हे दिवे लावून 'संत केजाजी महाराज माऊली प्रसन्न' हे नाव साकारण्यात आले.

wardha
undefined

पिता पुत्र संत असणारी घोराड नगरी विदर्भातील प्रतिपंढरी म्हणून ओळखली जाते. ११२ वर्षाची परंपरा असलेला हा पुण्यतिथी सोहळा साजरा केला जातो. केजाजी महाराजांच्या मंदिरात या सप्ताह निमित्त परायणाचे आयोजन केले जाते. संपूर्ण गावसह मंदिराला विद्युत रोषणाई केली जाते. विठ्ठल रुक्मीणी मंदिराच्या सभा मंडपात हा डोळे दिपावणारा सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. संत केजाजी माऊली प्रसन्न या जयघोषाने दुमदुमली. या निमित्ताने मंगळवारी शंकरजीच्या मंदिर परिसरात रिंगण सोहळा रंगतो.

Intro:तब्बल अडीच हजार दिव्यांची पंतीने साकारले 'संत केजाजी माऊली'

- संत केजाजी महाराज पुण्यतिथी सोहळा
- परायनाचा समारोप महिलांनी प्रज्वलीत केले दिवे

वर्धा- वर्ध्यातील सेलू घोराड संत केजाजी आणि त्यांचे पुत्र नामदेव महाराजांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त घोराड नगरीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात आज पारायण समाप्तीचा निमित्य 112व्या पुण्यतिथीला मंदिरात तब्बल अडीच हजार दिवे प्रज्वलीत करण्यात आले. परायनाचा समारोपाला नंतर महिलांनी हे दिवे लावून 'संत केजाजी महाराज माऊली प्रसन्न' हे नाव साकारण्यात आले.

पिता पुत्र संत असणारी घोराड नगरी विदर्भातील प्रतिपंढरी म्हणून ओळखली जाते. 112 वर्षाची परंपरा असलेलं हा पुण्यतिथी सोहळा संपूर्ण गावात साजरा केला जातो. केजाजी महाराजांच्या मंदिरात या सप्ताह निमित्य परायननाचे आयोजन केले जाते. संपूर्ण गावसह मंदिराला रोषणाई केली जाते. भजन किर्तन सोहळा या सप्ताह निमित्य आयोजित केला जातो.

याच पारायनाचा समारोप निमित्ताने महिलांनी दिवे प्रज्वलीत करत आरास मांडली. विठ्ठल रुख्मिनी मंदिराच्या सभा मंडपात हा डोळे 'दिप'वणारा सोहळ्यासाठी गावातील भक्तांनी गर्दी केली होती. संत केजाजी माऊली प्रसन्न या जयघोषाने दुमदुमली. या निमित्याने मंगळवारी शंकरजीच्या मंदिर परिसरात रिंगण सोहळा रंगतो. या सोहळ्याला पाहण्याससाठी पंचक्रोशीतील गावकरी गर्दी करतात.

Body:पराग ढोबळे वर्धा.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.