ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांड : एप्रिल महिन्यात नोंदवणार 14व्या साक्षीदाराची साक्ष - हिंगणघाट जळीतकांड सुनावणी

३ फेब्रुवारी २०२०ला हिंगणघाट येथे एका प्राध्यपक तरुणीला जिवंत जाळल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सध्या साक्षीदार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Hinganghat
हिंगणघाट जळीतकांड
author img

By

Published : Feb 18, 2021, 9:39 AM IST

वर्धा - हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात सलग तीन-तीन दिवस खटल्याचे कामकाज चालले. या प्रकरणी आतापर्यंत 13 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. यामध्ये 13वे साक्षीदार हे कबुली पंचनाम्याचे पंच असून त्याची बचाव पक्षाकडून उलट तपासणी होणे बाकी आहे. 20 मार्चला त्यांची साक्ष होणार आहे. 5 एप्रिलला 14वा साक्षीदार न्यायालयात हजर होणार आहे.

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील १४ व्या साक्षीदाराची साक्ष एप्रिल महिन्यात नोंदवणार

कबुली पंचांची साक्ष महत्त्वाची -

बुधवारी (17 फेब्रुवारी)ला सुनावणीच्या तिसऱ्या दिवशी प्रकरणातील ५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यामध्ये नागपूर येथील शवविच्छेदन करणारे डॉक्टर, हिंगणघाट उपजिल्हा रुग्णलायत पीडितेवर प्राथमिक उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी, पीडितेची मैत्रीण व पीडितेच्या महाविद्यालयातील दोन विद्यार्थीनीची साक्ष नोंदवण्यात आली. यातील कबुली पंच यांची 20 तारखेला साक्ष होणार आहे. 20 तारखेला सरकारी वकील उज्ज्वल निकम हे उपस्थित राहणार नसून केवळ बचवपक्षाकडून उलटतपासणीचे कामकाज न्यायालयात चालणार आहे. कबुलीनामा लिहिणाऱ्यांची आणि जप्ती पंचनामा करणाऱ्यांची साक्ष महत्वाची ठरणार असल्याचे दोन्ही बाजूंच्या वकिलांनी सांगितले.

घटनेच्या दोन महिन्यांपूर्वी पीडितेला मारेकऱ्याने अडवल्याची माहिती -

कॉलेजमधील एक विद्यार्थीनी आणि दरोडा येथील एका विद्यार्थीनीची साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरू शकेल, असे अ‌ॅड उज्वल निकम यांनी सांगितले. पीडित प्राध्यापिकेला घटनेच्या दोन महिन्यांपूर्वी देखील आरोपीने रस्त्यात अडवून विचारणा केल्याचे साक्षी पुराव्यात समोर आले आहे. याप्रकरणी आणखी सात ते आठ जणांची साक्ष बाकी आहे. 5 एप्रिलला 14वा साक्षीदार नोंदवला जाणार आहे.

काय आहे प्रकरण -

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नांदोरी चौकात सोमवारी (३ फेब्रुवारी २०२०) प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते. यामध्ये ती ४० टक्के भाजली होती. तसेच तिचा चेहरा, श्वसननलिका पूर्णपणे जळाली होती. तिच्यावर नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, घटना झाल्यानंतर आठव्या दिवशी मृत्यू झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.