ETV Bharat / state

पुरामुळे अडकलेली बस तीन तासांनी सुटली; विद्यार्थ्यांसह प्रवाशांनी सोडला सुटकेचा श्वास - s.t bus stranded for 3 hours left after help

शाळेचे विद्यार्थी तसेच गावकऱ्यांना घेऊन ही बस सावरडोह भागातून जात होती. दरम्यान या भागातून जात असताना ती मध्येच अडकली. यावेळी इतर वाहनेसुद्धा अडकून पडली होती. बसमध्ये जवळपास 60 ते 70 प्रवाशी अडकून असल्याची माहिती बस चालक निळकंठ काकडे यांनी प्रशासनाला दिली होती.

बिस्कीटचे पुड्यांचा वाटप करताना पंचायत समिती सभापती मंगेश खवशी
author img

By

Published : Aug 9, 2019, 1:24 AM IST

वर्धा- कारंजा-नारा-तारासावंगा मार्गावरील सावहरडोह गावाजवळील खडका नदीवरील पूल पाण्याखाली आल्याने बसमधील प्रवाशांसह अनेकजण अडकले होते. तब्बल तीन तासानंतर नाल्याचे पाणी उतरल्यावर अडकलेली बस आपल्या मार्गावर निघाली.

पुरामुळे अडकलेली बस तीन तासांनी सुटली

शाळेचे विद्यार्थी तसेच गावकऱ्यांना घेऊन ही बस सावरडोह भागातून जात होती. दरम्यान या भागातून जात असताना खडका नदीवरील पूल पाण्याखाली आल्याने बस मध्येच अडकली. यावेळी इतर वाहनेसुद्धा अडकून पडली होती. या बसमध्ये जवळपास 60 ते 70 प्रवाशी अडकून असल्याची माहिती बस चालक निळकंठ काकडे यांनी प्रशासनाला दिली. यावेळी तहसीलदार यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. पंचायत समिती सभापती मंगेश खवशी देखील बिस्कीट व खाण्याचे साहित्य घेऊन बसमध्ये पोहचले. सकाळपासून शाळेसाठी निघालेली मुले भुकेजून गेली होती. यावेळी चिमुकल्यांच्या हाती बिस्कीटचे पुडे येताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. अखेर नाल्याचे पाणी उतरल्यावर साडेसहा वाजतापासून अडकलेली बस तब्बल साडेनऊ वाजताच्या सुमारास गावाकडे निघाली. यावेळी विद्यार्थ्यांसह प्रवाश्यानी सुटकेचा श्वास सोडला.

Intro:पुरामुळे अडकलेली बस तीन तासांनी सुटली,

- कारंजा तालुक्यात दिवससभराच्या पावसाने नदी नाल्याने पूर

वर्धा- कारंजा तालुक्यातील उमरी मार्गावरील जसापूर किन्हाळा मार्गावरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने समोरील गावाचा संपर्क तुटला होता. याचवेळी कारंजा नारा तारासावंगा मार्गावरील सावहरडोह गावाजवळील खडका नदीवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने बसमधील प्रवाश्यांसह अनेकजण मध्येच अडकले होते. यात तब्बल तीन तासांनी नाल्याचे पाणी उतरल्याने अखेर वाहतूक सुरळीत झाली. चिमुकल्यासह प्रवाशी घरी पोहचलेत.

सावरडोह भागातून जात असतानाच शाळेचे विद्यार्थी तसेच गावकऱ्यांना घेऊन जाणारी बस अडकली. यावेळी इतर वाहने प्रवास करणारे दुचाकी धारक सुद्धा अडकून पडले होते. या बसमध्ये जवळपास 60 ते 70 प्रवाशी अडकुन असल्याची माहिती बस चालक निळकंठ काकडे यांनी प्रशासनाला दिली. यावेळी तहसीलदार यांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले. याची माहिती पंचायत समिती सभापती मंगेश खवशी यांना मिळताच बिस्कीट खाण्याचे साहित्य घेऊन बसमध्ये पोहचले. यावेळी सकाळपासून शाळेसाठी निघालेली मुले भुकेजून गेली होती. खरतर प्रशासनाने हे करणे गरजेचे होते. यामुळे चिमुकल्याच्या हाती बिस्कीटचे पुडे लागताच भूक मिटवली. यावेळी चिमुकल्यांचा चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.

अखेर साडेसहा वाजतापासून अडकलेली बस तब्बल साडेनऊ वाजताच्या सुमारास गावाकडे निघाली. यावेळी विद्यार्थ्यांसह प्रवाश्यानी सुटकेचा श्वास सोडला. यामुळे मंगेश खवशी यांनी वेळेचे भान ओळखून पोंहचवलेल्या मदतिने चिमुकल्याच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळाला. बस पुढे जाऊन प्रवाश्याना सोडून कारंजाला परत आली.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.