ETV Bharat / state

पवनारच्या आशा वर्करांच्या कामाची 'टाईम'ने घेतली दखल; मानधन वाढीसाठी सरकारकडे 'आशा'च - पवनारच्या आशा वर्कर टाईम मासिक

बिकट कोरोना काळात आशा वर्कर प्रशासन आणि नागरिक यांच्यात दुवा ठरल्या. अवघ्या दीड हजार रुपयांच्या तुटपुंज्या मानधनावर करत असलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवर 'टाइम' या मासिकाने घेतली. वर्ध्याच्या पवनार येथील अर्चना घुगरे या जागतिक पातळीवर झळकल्या असून आशा वर्करच्या व्यथा जागतिक पातळीवर मांडल्याने दुर्लक्षित घटकांचे महत्त्वाचे काम पुढे आले आहे. याचा आढावा घेऊयात या खास वृत्तातून...

वर्धा
वर्धा
author img

By

Published : Apr 6, 2021, 10:50 PM IST

वर्धा - भयावह कोरोनाच्या काळात जिथे लोकांनी स्वत:ला घरात सुरक्षित करून घेतले. त्यावेळी आशा वर्कर यांनी घराबाहेर पडून जीवाची परवा न करता घरोघरी जाऊन काम केले. आशा वर्कर प्रशासन आणि नागरिक यांच्यात दुवा ठरल्या. अवघ्या दीड हजार रुपयांच्या तुटपुंज्या मानधनावर करत असलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवर 'टाइम' या मासिकाने घेतली. वर्ध्याच्या पवनार येथील अर्चना घुगरे या जागतिक पातळीवर झळकल्या असून आशा वर्करच्या व्यथा जागतिक पातळीवर मांडल्याने दुर्लक्षित घटकांचे महत्त्वाचे काम पुढे आले आहे.

पवनारच्या आशा वर्करांच्या कामाची 'टाईम'ने घेतली दखल

अर्चना रामदास घुगरे... या विनोबांची कर्मभूमी असलेल्या पवनार गावी आशा वर्कर म्हणून कार्यरत आहेत. कोरोना काळात प्रत्येक जण सुरक्षित वातावरण शोधत असताना पोलीस, महसूल विभागासोबतच फ्रंटलाईन वर्कर म्हणून आरोग्य यंत्रणेंतर्गत आशा वर्करनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. यासोबतच कुटुंबात कोरोनाची लागण होऊ नये आणि बाहेर संक्रम रोखण्याची दुहेरी जबाबदारी पार पाडली.

कौटुंबिक साथ लाभल्याने अडचणींचा काळ निघाला..

अर्चना घुगरे सांगतात की, कोरोनाच्या संक्रमणाच्या परिस्थितीत काम पडेल तेव्हा फिल्डवर जावे लागत होते. कौटुंबिक साथ मिळाल्याने हे काम करण्यास त्यांना अडचणीवर मात करता आली. सुरुवातील एखादा रुग्ण सापडला की, त्या रुग्णाची माहिती देणे, थेट प्रतिबंधीत क्षेत्रात जाऊन काम करणे. त्या परिसरात रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करायला लावणे, नोंदी घेणे आदी कामे मोठ्या प्रमाणात तणाव वाढवणारी आणि आव्हानात्मक होती.

अनेक चांगले वाईट अनुभव आलेत....

कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी घरोघरी जाऊन आशा वर्करना काम करणे सोपे नव्हते. यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. अनेकदा घरात असणाऱ्या मंडळींची माहितीही खरी सांगण्यास टाळाटाळ करत अनेकदा वादही घालत होते. यामुळे अनेक चांगले-वाईट अनुभव त्यांना याकाळात आपले असल्याच्या सांगतात. पण, आता मात्र कामाचे महत्व लोकांना पटले आणि आता त्यांना मान-सन्मान मिळू लागल्याने समाधान व्यक्त होत आहे.

कामाची दखल का घ्यावी लागली....कारण दीड हजाराच्या मानधनात करतात काम...

या काळात आव्हानात्मक काम करताना त्यांना मात्र स्वतःचा जिवाची परवा न करता काम करावे लागले. यासाठी त्यांना काही फार सुविधा नव्हत्या. तोकड्या सुविधा, बरेचदा अनेकांकडून होणारा विरोध, प्रतिकूल वातावरणातही त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या. आरोग्य व्यवस्थेत नागरिकांकडून माहिती घेणे, जनजागृती करणे, शासनाच्या नियमांची माहिती देण, बाधितांचे सर्वेक्षण करणे आदी जबाबदाऱ्या पार पाडल्या. आताही त्या पार पाडत आहेत. कोरोनाबाधितांचे घर असो की विलगीकरणातील घर असो, त्यांना मात्र गृहभेटी देण हे महत्त्वाचे काम करत. पण 1500 रुपये महिन्याकाठी मानधन मिळवण्यासाठीचे हे काम पाहून जागतिक दर्जाच्या टाईम या मासिकात त्यांच्यावर लेख लिहण्यात आला.

टाइमच्या महिला पत्रकार यांनी घेतली कामाची दखल...

नोव्हेंबर महिन्यात टाईम मासिकाच्या पत्रकार अवंतिका यांनी आशा वर्कर अर्चना घुगरे यांच्याकडून माहिती घेतली. त्यांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेण्यात आल्या. इतक्या अल्प मानधनावर आशा वर्करवर कशा काम करतात, हे जागतिक पातळीवर जाऊन पोहचले. यावेळी त्यांना काही व्हिडिओ मागविलेत होते. अर्चना यांच्या व्हिडीओ, आणि माहितीला सर्वाधिक पसंती मिळाली आणि टाईम मॅगझिनमध्ये त्या सचित्र झळकल्या. यामुळे गावातही आनंद व्यक्त होत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या अपुऱ्या सोयी सुविधा, अल्प मानधनात आशा वर्कर जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. येणाऱ्या सूचनांची, सरकारी आदेशांची अमलबजावणी करत आहेत. पण, मानधन वाढीची त्यांच्याकडून वेळोवेळी मागणी होते. पण याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याने अजूनही मानधन वाढीच्या प्रतीक्षेत आशा 'आशा' लावूनच बसल्या आहेत. कौतुक झाले असले तरी याने पोट भरत नाही, ही व्यथा सरकारने समजून घेत विचार करावा असे म्हणत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.