वर्धा - सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित गुन्ह्यात पाच आरोपींचा सहभाग असून त्यांना अटक करण्यात आली आहे. यातील दोघे पीडितेच्या परिचयाचे असून ते एकाच महाविद्यालयात शिकत होते. या घटनेनंतर पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या असून एका अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.
शुभम कांबळे आणि वैभव कांबळे अशी दोन आरोपींची नावे आहेत. यांसह आशिष गर्दने, आकाश भोसले आणि अन्य एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. यातील चौघांचा अत्याचार समावेश असून एकाने संबंधित प्रकरणात मदत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर नुसार चौघांनी निर्जन स्थळी मद्यपान करून पीडितेला देखील मद्यपान करण्यास भाग पडले. तसेच यानंतर त्यांनी आळीपाळीने अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पुढील तपास महिला पोलीस अधिकारी करत असल्याची माहिती मिळत असून सध्या चौघांना पोलीस कोठडी देण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांनी सांगितले.