वर्धा: स्थानीक नगरपालिकेमध्ये घनकचरा संबंधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (असंघटित कामगार सेल) दिलीप पोटफोडे यांनी केला. वारंवार प्रशासनाच्या लक्षात हा मुद्दा आणून देऊनही कोणतीच कार्यवाही होत नसल्याने अखेर आज हे आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे ही नगरपालिका भाजपचे आमदार दादाराव केचे यांच्याकडे होती. आता कार्यकाल संपल्याने तिथे प्रशासक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, वर्धा जिल्ह्यातील आर्वी न.प च्या आरोग्य विभागाअंतर्गत, केंद्र शासनाच्या 14 व्या वित्त आयोगातून प्राप्त निधीतून खर्च करून घनकचरा संकलन वाहतूक वर्गीकरण व प्रक्रिया कंत्राट शहरातील साफ -सफाई स्वछता, निरामय आरोग्य व कचरा निर्मूलन या दृष्टीने केंद्र व राज्य सरकार राबवित आहे; परंतु आर्वी न. प. मध्ये घंनकचरा व मनुष्य बळ कंत्राट ह्यात मोठया प्रमाणात आर्थिक अनियमितता, अपहार व उघड दिसणारा भ्रष्टाचार सुरु आहे. केंद्र व राज्य सरकार च्या दिशा निर्देशांना पायदळी तुडवल्या जात आहे. मूळ उद्देशाला आर्थिक हितसाध्य करण्यासाठी कंत्राटदारांकडून जबाबदार अधिकारी, कर्मचारी, दलालांशी संगणमत करून मुळ उद्देशाला हरताड फासला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कचरा संकलनावरून वाद: घनकचरा संकलन वाहतूक वर्गीकरण आणि प्रक्रिया कंत्राटात मूळ उद्देश हा आर्वी शहरातून निघणाऱ्या कचऱ्याची, वाहतूक करून, वर्गीकरण करणे, त्यावर प्रक्रिया करणे व शहरातील कचऱ्या पासून प्रक्रियेद्वारे खत निर्मिती करणे व कचरा निर्मूलन करणे हाच होता. निविदा काढताना प्रक्रिया करणे हा मूळ उद्देश ठेऊनच प्रशासकीय मान्यता मिळवली. निविदा मागवल्या आणि त्यामुळे च कमी निविदा या कंत्राटासाठी आल्या वास्तविक आर्वी न.प.च्या जबाबदार अधिकारी व सत्ता काळातील पदाधिकारी ज्यांचा आज ही यांत खुल्ला वावर आणि हस्तक्षेप आहे. त्यांनी हा भ्रष्टाचार करण्याच्या दृष्टीनेच हे नियोजन केलेले होत. पण आज आर्वी न.प च्या नियोजित भ्रष्टाचाराची खुली प्रचिती आपल्याला पाहायला मिळत आहे की, या प्रकल्पाच्या मूळ उद्देशाला हरताड फासत ही प्रक्रिया सुरूच झाली नसल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे. म्हणून कोट्यावधीची देयके नगर पालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी, सत्ताधारी पदाधिकारी,यांच्याशी संगणमत करून कंत्राट दाराला दिलेले असल्याचे सुद्धा निवेदनात सांगण्यात आले आहे.
हा खुला भ्रष्टाचार: हा खुला भ्रष्टाचार असून, या कंत्राटात दिलेल्या अटी शर्थी व नियमांनुसार कोणतंही काम केल्या जात नसून भ्रष्टाचारी शासन प्रशासनाला जुमानत नसून ठोकरीवर उडवते ही स्थिती अधिकाऱ्यांच्या भ्रष्टवृत्ती मुळे निर्माण झाली आहे. पूर्णतः नागरिकांच्या व सरकार शासन प्रशासनाच्या पैश्याची लूट केली जात असल्याचे गंभीर आरोप सुद्धा लावण्यात आले आहे. म्हणून निदर्शने आंदोलनातुन बोध घेत भ्रष्टाचार करणाऱ्या सर्व जबाबदार अधिकारी कर्मचारी यांच्या सर्व्हिस बुक वर, चौकशीअंती भ्रष्टाचार, अनियमितता व अपहार याची नोंद घेत त्यांच्यावर कायम स्वरूपी सक्तीच्या रजेची कारवाई करावी, मूळ काम न करताच कंत्राटदाराला न.प द्वारा दिलेल्या पूर्ण रकमेची रिकव्हरी करण्यात यावी. सर्व दोषीवर निशचित् काम न करता अपहार केल्या बद्दल व मूळ काम न करता देयक काढल्या बद्दल सखोल चौकशी करून फसवणूकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा: Shushma Andhare On Devendra Fadnavis: गृहमंत्री फडणवीस कुचकामी ठरत आहेत का? सुषमा अंधारे यांचा सवाल