ETV Bharat / state

वर्ध्यात काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती - हिंगणघाट

इच्छुक उमेदवारांपैकी 4 नावे वरिष्ठ पातळीवर पाठविली जाणार असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे. त्यामुळे यामधील कोणती नावे वरिष्ठ पातळीवर पाठविली जाणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

वर्ध्यात काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
author img

By

Published : Jul 29, 2019, 9:58 PM IST

वर्धा - हा जिल्हा इतिहासपूर्व काळापासून काँग्रेसचा गड राहिला होता. मात्र, आता काँग्रेसची अवस्था एकदम खराब झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीसाठी आर्वी विधानसभेसाठी कोणी अर्ज केला नाही, तर वर्धा विधानसभेसाठी आलेल्या 12 अर्जापैकी 4 जण मुलाखतीला गैरहजर होते. तर हिंगणघाट मतदारसंघातून एकही उमेदवार मुलाखतीसाठी आला नाही. त्यामुळे काँग्रेसवर भिंग घेऊन उमेदवार शोधण्याची वेळी येते की काय? असा सर्वांना प्रश्न पडत आहे.

वर्ध्यात काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

वर्धा विधानसभा मतदारसंघात इतर 3 मतदार संघाच्या तुलनेत सर्वाधिक इच्छुक उमेदवार पाहायला मिळाले. देवळी आणि आर्वीला विद्यमान आमदार असल्याने त्या ठिकाणी कोणी अर्ज केला नाही. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी 2 उमेदवारांनी अर्ज भरला होता. मात्र, त्यापैकी एकही उमेदवार मुलाखतीला आला नाही. वर्ध्याच्या काँग्रेस कार्यालय सद्भावना भवनात ही मुलाखत प्रक्रिया पार पडली.

तर या इच्छुक उमेदवारांपैकी 4 नावे वरिष्ठ पातळीवर पाठविली जाणार असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे. त्यामुळे यामधील कोणती नावे वरिष्ठ पातळीवर पाठविली जाणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

दरम्यान, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी अनेकदा चव्हाट्यावर आली आहे. मुलाखती दरम्यानही काही कार्यकर्त्यांकडून हाच प्रकार पुन्हा पाहायला मिळाला. काँग्रेसची परिस्थिती खिळखिळी झालेली असतानासुद्धा अंतर्गत कलह शांत होताना दिसत नाही. तर हिंगणघाट मतदारसंघ मागील काळात राष्ट्रवादीकडे असल्याने या ठिकाणी काँग्रेसचे पक्ष संघठण फारसे मजबूत नाही. त्यामुळेच या मतदारसंघासाठी कोणी मुलाखतीला आले नसल्याची चर्चा आहे.

काँग्रेसच्या या मुलाखतीसाठी मनीष शर्मा, पंकज गुड्डेवार, जिल्हा प्रभारी अनंतराव घारड, जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, आमदार रणजित कांबळे, अमर काळे, धनराज कुंभारे यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या.

Intro:वर्धा स्टोरी
विधानसभेसाठी कॉंग्रेसकडून मुलाखत प्रर्क्रिया पार, ८ उमेदवारांनी दिल्या मुलाखती.

वर्धा जिल्हा इतिहासपूर्व काळापासून कॉंग्रेसचा गड राहिला होता. आता मात्र हाल खस्ता झाली आहे. विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या असून त्यासाठी इच्छून उमेदवारांच्या मुलाखती आज घेण्यात आल्यात. वर्ध्याच्यात कॉंग्रेस कार्यालय सद्भावना भवनात हि मुलाखत घेण्याची प्रर्कीय पार पडली. देवळी आणि आर्वी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार असल्यानं तिथ कुणीही अर्ज सादर केला नाही. वर्धा विधानसभेकरीता मात्र १२ उमेदवारांचे अर्ज आले होते. त्यापैकी चार जण गैरहजर होते. तेच हिंगणघाट मतदारसंघातून अर्ज सादर करणारा एकही उमेदवार मुलाखतीकरीता आला नाही. मुलाखतीतून कोणाच्या नशिबी विधानसभेची तिकीटची लॉटरी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वर्धा विधानसभा मतदारसंघात तीन मतदार संघाच्या तुलनेत सर्वाधिक इच्छूक उमेदवार बघायला मिळालेत. देवळी आणि आर्वीला विद्यमान आमदार असल्यानं तिथ कुणीही अन्य उमेदवारांनी अर्ज भरला नाहीय. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, याकरीता दोन उमेदवारांनी अर्ज भरला होता. पण, त्यापैकी एकही उमेदवार मुलाखतीला आला नाही. आलेल्या
उमेदवारांपैकी चार नाव वरिष्ठ पातळीवर पाठविली जाणार असल्याची माहितीकाँग्रेसकडून देण्यात आलीय. यातील कोणती नाव वरिष्ठ पातळीवर पाठविली जाणार, याबाबत सर्वांनाच उत्सूकता लागली आहेय.

काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी अनेकदा चव्हाट्यावर आलेली आहे. मुलाखतीच्या दरम्यान मुलखात देतांना काही कार्यकर्त्यांकडून हाच प्रकार पुन्हा ऐकायला मिळत होता. काँग्रेसची परिस्थिती खिळखिळी झालेली असतान सुद्धा अंतर्गत कलह मात्र शांत होताना दिसत नाही आहे. यावेळी हिंगणघाट हा मतदार संघ मागील काळात राष्टवादीकडे असल्याने कॉंग्रेसचे पक्ष संघठण फारसे मजबूत नाही. यामुळेच कि काय कोणी मुलाखतीला आले नसल्याची चर्चा आहे.

मुलाखती मनीष शर्मा, पंकज गुड्डेवार, जिल्हा प्रभारी अनंतराव घारड, जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, आमदार रणजित कांबळे, अमर काळे, धनराज कुंभारे यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्यात.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.