ETV Bharat / state

वर्धा कारागृहात दुष्काळ, ५ दशकामध्ये पहिल्यांदा विहिरींनी गाठला तळ

पाण्याअभावी जवळपास ७ एकरावरील पीक करपले आहे. कोबीचा भुसा झाला आहे. चवळीचे पीकही करपले आहे. त्यामुळे कैद्यांना खायला काय द्यावे? असा प्रश्न कारागृहासमोर उभा झाला आहे. तसेच दुष्काळामुळे शेतात काम नसल्याने कैद्यांच्या कामावरही गदा आली आहे.

वर्धा कारागृह
author img

By

Published : May 18, 2019, 8:31 AM IST

वर्धा - शहरातील कारागृहात भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. पाण्याची गरज भागवायला येथे एक नव्हे तर ६ विहिरी आहेत. मात्र, गेल्या ५ दशकांमध्ये यंदा सहाही विहिरींनी तळ गाठला आहे.

वर्धा कारागृहातील भीषण दुष्काळ

कैद्यांना रोज पिण्यासाठी, स्वछतेसाठी पाणी लागत असते. सोबतच अन्न शिजवायला सुद्धा पाणी पाहिजे. सुरुवातीला नगरपरिषदेतून पाणी पुरवठा होत होता. मात्र, दररोजच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन १६ हजार लिटर ते १७ हजार लिटर नळाने भागवली जाऊ शकत नाही. मात्र, शहरात ४ ते ५ दिवसांनी पाणी पुरवठा होत होता. त्यामुळे कारागृहाला पाणीपुरवठा करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना विनंती करण्यात आली. त्यानंतर कारागृहासाठी पोलीस मुख्यालयातील विहिरीतून टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. आता नगर परिषदेकडून दिवसभरात ११ हजार लिटरच्या घरात पाणी पुरवले जात असल्याचे कारागृह अधीक्षक अनिल खामकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

पाणी टंचाईने कारागृहात रोगराई पसरण्याची भीती -
पाणी नसल्यास कारागृहात अस्वच्छता होईल. कैद्यांना स्वच्छतेसाठी पाणी पाहीजे असते. मात्र, कारागृहात दुष्काळ पडल्यामुळे आरोग्याचे प्रश्न उद्भवण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काराृह अधीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी कैद्यांना पाणी काटकसरीने पाणी वापरण्याच्या सुचना दिल्या आहेत.

शेतीपिकाचे नुकसान -
वर्धा कारागृह शेतीत उत्पन्न घेण्यात नेहमीच अव्वल राहिले आहे. मात्र, दुष्काळामुळे यंदा हे कारागृह तोट्यात गेले आहे. पाण्याअभावी जवळपास ७ एकरावरील पीक करपले आहे. कोबीचा भुसा झाला आहे. चवळीचे पीकही करपले आहे. त्यामुळे कैद्यांना खायला काय द्यावे? असा प्रश्न कारागृहासमोर उभा झाला आहे. तसेच दुष्काळामुळे शेतात काम नसल्याने कैद्यांच्या कामावरही गदा आली आहे.

Intro:वर्धा
mh_war_tanker in jail story_pkg_7204321

पूर्ण pkg स्टोरी एडिट करून पाठवली आहे. चुका नक्कीच झाल्या आहे. कृपया त्या संगीतल्यास सुधारणा नक्की करता येइल. मार्गदर्शन करावे.

वर्धा कारागृहात दुष्काळ...पाच दशकांनी सहा विहारींनी गाठला तळ

वर्ध्यातील कारागृह हे इंग्रजकालीन असून दीडशे वर्ष जून आहे. या कारागृहात सध्या पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील 5 दशकांचा काळ पाहता हा दुष्काळ अनुभवायला मिळत असल्याचे सांगितले जात आहे. कैदी असले म्हणून काय झाले पाण्याशिवाय कसे जगाचे या प्रश्नाचे उत्तर म्हणून टँकरने तहान भगवाली जात आहे.

वर्ध्यातील कारागृहात जवळजवळ 300 ते साडेतीनशे कैदी बांधव राहतात. पाण्याची गरज भागवायला येथे एक दोन नव्हे तर सहा विहिरी आहे. पण आश्चर्य म्हणजे सहा विहारींनी तळ गाठला. यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली. कारागृहात बाहेरून कोणाला जाता येत नाही असे म्हटले जाते. पण दुष्काळ विना परवानगीनेच का होईना आता प्रवेश करून गेला. याचा परिणाम मोठ्या प्रमाणात आतमध्ये जाणवायला लागला.

कौद्याना रोज पिण्यासाठी, अंघोळ स्वछता म्हटले तर पाण्याशिवाय होणार कसे. सोबतच अन्न शिजवायला सुद्धा पाणी पाहिजेच. सुरवातीला विहिरीतून गरज पडल्यास त्यामुळे नगर परिषदेची पाईपलाईनच्या सह्याने पाणीपुरवठा केला जातो. पण रोजची पाण्याची गरज हे 16 हजार लिटर ते 17 हजार लिटर नळाने भागवल्या जाऊ शकणार नाही. यात शहरही पाणी टंचाई असल्याने चार ते पाच दिवसांनी पाणी पुरवठा होत होता. त्यामुळे पोलीस अधीक्षक यांना विनातीवरून एक टँकर सुरू झाला.

पाणी टंचाईने कारागृहात रोगराई पसरण्याची भीती....
पाणी नसल्याने अनेक जण आंघोळ स्वच्छता करण्यास जर टाळाटाळ करू लागला तर भयंकर परिणाम दिसेल. यामुळे अनेक आरोग्याचे प्रश्न उदभवतील. यासाठी पर्यायी म्हणून कारागृह अधीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी कैद्यांना सूचना देत पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना दिल्या आहे.

पोलीस मुख्यालयातून मिळाले पाणी
सुरुवातील नगर परिषद पाणी देऊ शकत नसल्याने पोलीस प्रशासनकडे असणाऱ्या एका टँकरच्या साह्याने पोलीस मुख्यालयात असणाऱ्या विहारीतील पाणी पुरवले गेले. आता नगर परिषदेकडून दिवसभरात 11 हजार लिटरच्या घरात पाणी पुरवले जात असल्याचे कारागृह अधीक्षक अनिल खामकर यांनी ईटीव्हीला बोलतांना संगीतले.

कारागृहात पाणी साठा होतोय पाण्याच्या टाकीत
सध्या टँकर येताच आलेले पाणी हे कारागृह कार्यालयाच्या जवळ हे पाण्याच्या भल्यामोठ्या टाक्या ठेवून हे पाणी साठवले जात आहे. त्यांनतर या पाण्याचा उपसा करून स्वयंपाक पिण्याचे आणि इतर गोष्टीसाठी हे पाणी वापरले जात आहे.

शेतीपिकाचे नुकसान, पीक करपले

पाणी नाहीच म्हटल्यावर करणार तरी काय असा प्रश्न उभा ठाकला असता शेतीला पाणी कुठून आणणारा. यात विहिरी आटल्याने पाणी मिळणे अशक्यच झाले. याच पाण्या अभावी जवळपास 7 एकरावरील पीक गेले. कोबीचा पाण्याअभावी भुसा झाला. वांगे तर झाडाला आलेच नाही. चळवळीचे झाडेही जळालेत. हेच इतर पिकांनासोबत झाले. शेतीच्या उत्पन्न घेण्यात विदर्भात अवल असणारे कारागृह तोट्यात गेले. यापेक्षा दुष्काळ काय असेल. मग या दुष्काळाने शेतात काम नसल्याने खुल्या कैद्यांच्या कामावरही गदा आली.

उपाययोजनांची गरज, विहिरीचे पुनर्भरणही गरजेचे
जे पाच दशकात नाही घडले याचे कारण म्हणजे जमिनीतील पाणी आता संपले. सहा विहिरीतील झरे तुटले. पर्जन्यमान कमी झाले. भविष्यातील दाहाकता लक्षात घेता विहिरींचे पुनर्भरण होणे गरजेचे आहे. जेणेकरून भूजल पातळीत वाढ व्हायला मदत होईल. यासोबत इतरही पर्याय शोधून उपचार केले तरच भविष्यातील दुष्काळी रोगावर नियंत्रण करणे गरजेचे आहे.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.