ETV Bharat / state

वर्ध्यातील शेतकरी कापूस विक्रीपासून वंचित राहू नये, पालकमंत्री सुनील केदार यांचे आदेश

author img

By

Published : May 28, 2020, 7:58 AM IST

पालकमंत्री सुनील केदार यांनी जिल्ह्यातील 14 जिनींग प्रेसिंगला भेट दिली. यावेळी केदार यांनी संकलन केंद्रावर कापूस खरेदीसाठी जिनिंगला असलेल्या समस्या तसेच बाजार समितीच्या जिनिंगच्या संचालकांसोबत चर्चा करुन त्यांच्याही समस्या जाणून घेतल्या. शेतकरी कापूस खरेदीपासून वंचित राहू नये यासाठी नियोजन करण्याच्या सूचना केदार यांनी दिल्या.

 Guardian Minister Sunil Kedar
सुनिल केदारांनी दिली जिनींग प्रेसिंगला भेट

वर्धा - लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या घरात कापूस शिल्लक राहिलेला आहे. हा सर्व कापूस पावसाळा सुरू होण्यापूर्वी विक्री होणे आवश्यक आहे. यासाठी कापूस खरेदी केंद्राने रोज 100 शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा. संकलन केंद्रावर असलेल्या कापूस गाठी सरकीची उचल करावी, अशा सूचना राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी दिल्या.

पालकमंत्री सुनील केदार यांनी जिल्ह्यातील 14 जिनींग प्रेसिंगला भेट दिली. यावेळी केदार यांनी संकलन केंद्रावर कापूस खरेदीसाठी जिनिंगला असलेल्या समस्या तसेच बाजार समितीच्या जिनिंगच्या संचालकांसोबत चर्चा करुन त्यांच्याही समस्या जाणून घेतल्या. शेतकरी कापूस खरेदीपासून वंचित राहू नये यासाठी नियोजन करण्याच्या सूचना केदार यांनी दिल्या.

रोज 100 गाड्यांचे नियोजन करा -

सीसीआयकडे आवश्यक ग्रेडर कमी असल्यामुळे बाजार समित्यांनी त्यांच्याकडचे ग्रेडर तसेच आवश्यक मनुष्यबळ सीसीआयला पुरवावे. शनिवार शासकीय सुट्टीच्या दिवशीसुध्दा शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी सुरु ठेवावी. एकही शेतकरी कापूस विक्रीपासून वंचित राहू नये यासाठी बाजार समित्यांनी सीसीआयसोबत समन्वय साधून काम करावे, असेही केदार म्हणाले. जिल्हयात 11 कापूस खरेदी केंद्र सुरु असून तीन केंद्र नव्याने सुरु करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर येत्या दोन दिवसात आणखी 3 कापूस खरेदी केंद्र सुरु होणार असल्याचे जिल्हा उपनिबंध गौतम वालदे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील 'या' 14 जिनिंगला दिल्या भेटी -

सेलू तालुक्यातील गोल्ड फायबर जिनिंग, वासुदेव जिनींग सिंदी रेल्वे, समुद्रपूर तालुक्यातील श्रीकृष्ण जिनिंग व प्रेसिंग घोडगाव, हिंगणघाट तालुक्यातील साईकृपा ऍग्रो प्रोसेसर्स, जे.आर. टेक्सटाईल, धनराज कॉटेक्स, देवळी तालुक्यातील संस्कार ऍग्रो प्रोसेसर्स वायगाव, संत गजानन जिनिंग, श्रीकृष्ण जिनींग, जय बजरंग जिनिंग प्रेसिंग, संत गजानन माऊली जिनींग अँड प्रेसिंग पुलगाव, आर्वी तालुक्यातील रामकृपा फायबर्स खरांगणा, एम.आर. जिनींग तळेगाव, एमडीव्हीएस असोसिएट या 14 जिनिंगला पालकमंत्र्यांनी भेट दिली. सेलू येथील गोल्ड फायबर जिनिंग येथे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, तहसिलदार महेंद्र सोनवणे, गोल्ड फायबर जिंनिंगचे संचालक सिंघानिया उपस्थित होते. तर हिंगणघाट येथे अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, आमदार समीर कुणावार, सुधीर कोठारी, माजी आमदार राजू तिंमाडे आणि देवळी येथे आमदार रणजित कांबळे यांची उपस्थिती होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.