वर्धा - आज विदर्भातील पाहिल्या टप्प्याच्या निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेसह पाच तालुक्यांचा समावेश आहे. आज धामणगाव तालुक्यातील देवगाव येथे सकाळी ७ वाजता पासूनच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी जमली होती. वर्ध्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.३२ टक्के मतदान झाले आहे.
या मतदार संघात एकूण चौदा उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. दरम्यान मोलमजुरीला जाणाऱ्या मतदारांनीदेखील मतदान करून आपला हक्क बजावला आहे.
- वर्ध्यात उन्हाचा पारा वाढल्याने मतदानाला नागरिकांची गर्दी ओसरली. उन्हाची तिव्रता कमी झाल्यानंतर टक्केवारी वाढण्याची शक्यता.
- वर्ध्याच्या देवळी येथील अग्निशामक केंद्रातील असलेल्या मतदान केंद्रावर ७० वर्षिय वृध्द महिलेने बजावला मतदानाचा हक्क
- वर्ध्याच्या महात्मा गांधी आश्रमातील मार्गदर्शिका म्हणून काम करणाऱ्या महिलांनीही बजावल मतदानाचा हक्क
- १:३५ - वर्ध्यात १ वाजेपर्यंत ३०.२२ टक्के मतदान
- १:०४ - ४ महिन्यांच्या चिमुकलीला सोबत घेऊन येत वर्ध्याच्या आफ्रिन शेख या महिलेने बजावला मतदानाचा हक्क
- ११:५५ - वर्ध्यात ११ वाजेपर्यंत १५.७६ टक्के मतदान
- ९:३० - भाजप उमेदवार रामदास तडस यांनी सकाळी ९.३० वाजता यशवंत माध्यमिक कन्या शाळा देवळी येथे संपूर्ण कुटुंबासह मतदान केले.
- ९:०० - वर्ध्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.३२ टक्के मतदान
- ११:०० - वर्धा मतदारसंघात सेवाग्राम, देवळी गावांमध्ये मतदारांच्या तक्रारी, मतदार यादीत नावे सापडेना.
- ११:१५ - वोटर स्लीप न मिळाल्याने सर्वत्र गोंधळ सुरू, नाव शोधण्यासह मतदान केंद्रांचीही शोधा शोध
- ११:३० - काँग्रेस उमेदवार चारूलता टोकस यांनी देवळी तालुक्यातील कोल्हापूर (राव) येथील मतदार केंद्रात बजावला मतदानाचा हक्क
- २:०० - पहिल्यांदा मतदान करताना अनेक शंका भीतीचे निराकरण करत युवा पिढीने केले मतदान.