ETV Bharat / state

वर्ध्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; परिसरात दहशत

विठोबा आपल्या शेतात नेहमी प्रमाणे काम करत होते. एवढ्यातच शेताला लागूनच असलेल्या उमरविहारी शिवारातील न्यु बोर व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोनमधून आलेल्या वाघाने हल्ला चढवला.

मृत शेतकरी विठोबा दसरू वडुले
author img

By

Published : Jun 18, 2019, 8:31 AM IST

Updated : Jun 18, 2019, 1:40 PM IST

वर्धा - जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील न्यु बोर अभयारण्य परिसरात धानोलीजवळ वाघाने शेतकऱ्यावर हल्ला चढवला. यामध्ये शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. विठोबा दसरू वडुले असे मृताचे नाव आहे.

वर्ध्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

विठोबा आपल्या शेतात नेहमी प्रमाणे काम करत होते. एवढ्यातच शेताला लागूनच असलेल्या उमरविहारी शिवारातील न्यु बोर व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोनमधून आलेल्या वाघाने हल्ला चढवला. वाघाने शेतकऱ्याला फरफटत ओढून जंगलाच्या दिशेने नेले. परिसरातील शेतकऱ्याला समजताच त्यांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागाने तत्काळ रक्त सांडलेल्या दिशेने शोधमोहीम सुरू केली. यावेळी जंगलात शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सुन आणि दोन नातू असा परिवार आहे.

पिंकी नावाची वाघीण असण्याची शक्यता -
परिसरात दोन वाघाचा वावर आहे. यापैकी एका पिंकी नामक ३ वर्षीय वाघिणीने शेतकऱ्यावर हल्ला केल्याचे बोलले जात आहे. गेल्या आठ दिवसांपासून या वाघिनीचे दर्शन होत होते. तेव्हापासून या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर वाघिणीने आज शेतकऱ्यांचा नरडीचा घोट घेत जीव घेतला.

Intro:वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

वाघाच्या दहशतीने परिसरात भितीचे वातावरण

वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील न्यु बोर अभयारण्य परिसरातील धानोली सकाळी वाघाने हल्ला केला. यामुळे वाघाच्या हल्ल्यात 65 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली. विठ्ठोबा दसरुजी वडुले (65) असे मृतक व्यक्तीचे नाव आहे.

मृतक हा आपल्या शेतात नेहमी प्रमाणे काम करीत होता. एवढ्यातच शेताला लागूनच असलेल्या उमरविहारी शिवारातील न्यु बोर व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोनमधून आलेल्या वाघाने हल्ला चढवला. यावेळी झुंज देण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगितले जात आहे. वाघाने मृतक शेतकऱ्याला फरफटत ओढून जंगलाच्या दिशेने नेले. लगतच्या शेतकऱ्यांनी लक्षात येताच माहिती वन विभागाच्या देण्यात आली.

याची माहिती वनविभागाला मिळताच रक्त सांडलेल्या दिशेने शोध मोहीम राबत मृतदेहाचा शोध घेतला. यावेळी शेतकऱ्यांचा नरडीचा घोट घेतल्याने मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. यावेळी वन विभागाच्या वतीने पंचनामा करण्यात आला. घटनेची माहिती गावात पोहचताच भीतीचर वातावरण निर्माण झाले. शिवाय घटनेने वडुले कुटुंबियांसह गावात शोककळा पसरली. त्यांचा मागे पत्नी, मुलगा, सुन आणि दोन नातू असा आप्त परिवार आहे.

घटनेने नंतर मृतदेहाचा पंचनामा पोलिसांच्या उपस्थितीत करण्यात आला. या परिसरात दोन वाघांचा वावर असल्याचे सांगितले जात आहे.

पिंकी नावाची वाघीण असण्याची शक्यता....
या परिसरात दोन वाघाचा वावर आहे. यातील एक पिंकी नामक वाघिणीने आज हल्ला केल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. ही वाघीण तीन वर्षांच्याया घरात वय असल्याचे बोलाले जात आहे. वर्षभरापूर्वी मेट गावाच्या इसमावर वाघाचा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात सुदैवाने वाघाचा जीव वाचला.मागील आठ दिवसांपासून या वाघिनीचे दर्शन झाले होते. तेव्हापासून या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर वाघिणीने आज शेतकऱ्यांचा नरडीचा घोट घेत जीव घेतला.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
Last Updated : Jun 18, 2019, 1:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.