वर्धा - महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयात 'एक भारत श्रेष्ठ भारत' हा उपक्रम राबवला. याद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन विद्यापीठ परिसरात करण्यात आले. यातीलच जेवणोत्सवाच्या म्हणजेच 'फूड फेस्टिवल'मध्ये भारतातील विभिन्न राज्यातील खाद्य पदार्थ ठेवण्यात आले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून नृत्य कलेचे सादरीकरण करण्यात आले. देशभरातून शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत कला सादर केली.
जेवणोत्सवाच्या माध्यमातून वेग वेगळ्या राज्यातील पदार्थ बनवून विक्रीस ठेवण्यात आले होते. यानिमित्याने 'एक भारत श्रेष्ठ भारत' का म्हटले जाते याचा प्रत्यय पाहायला मिळाला. 40 हून अधिक स्टॉलवर बंगाली रसगुल्ला, महाराष्ट्रीयन पूरण पोळी, दाबेली, पनीर जंगली, छोले टिक्का, पुलाव, पावभाजी, सेवई, लिट्टी चोखा, आलू पराठा, गाजर हलवा, मटका रोटी, चटपटे चाट, वेग-वेगळ्या पदार्थांची मेजवानी देण्यात आली.
हेही वाचा - बल्ब, होल्डरवरही डल्ला; वर्ध्यात भुरट्या चोरांचा त्रास
या सांस्कृतिक महोत्सवातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी 'विंचू चावला'चे भारूड सादर केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा सादर करत त्यांचा जीवनपट उलघडण्यात आला. यासह इतर राज्यातील वेग-वेगळ्या नृत्य परंपरेचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.
या कार्यक्रमाला महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापीठाचे कुलगुरू प्रो रजनीश कुमार शुक्ल, प्रतिकुलपति प्रो. चंद्रकांत रागीट, कार्य-परिषदेच्या सदस्य व गांधीवादी चिंतक प्रो. कुसुमलता केडिया, एक भारत श्रेष्ठ भारत योजनेचे संयोजक डॉ. सुशील कुमार त्रिपाठी, प्रो कृपा शंकर चौबे, डॉ. गोपाल कृष्ण ठाकूर, बालराजू, बी एस मिरगे, अमित विश्वास, डॉ. राजेश्वर सिंह उपस्थित होते.
हेही वाचा - वर्धा : जिल्हा वार्षिक योजनेच्या 166 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखडयास मंजूरी