वर्धा - जिल्ह्यात रासायनिक खतांचा काळाबाजार होऊ नये यासाठी पीओएस मशीनने व्यवहार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, केंद्राच्या सूचनेनुसार रासायनिक खतांची विक्री करताना नियमांचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जिल्ह्यातील १८ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत या सर्व कृषी केंद्राचे परवाने सहा महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहेत.
पीओएस मशिनद्वारे शेतकऱ्यांना रासायनिक खते देताना आधार नंबर नोंदवला जातो. यामुळे शेतकाऱ्यांच्या नावाने व्यवहार नोंदवले जातात. याचा परिणाम म्हणून बाजारात रासायनिक खतांचा पुरवठा शेतकऱ्यांच्या गरजेनुसार उपलब्ध होता. यामुळे काळाबाजार रोखण्यास मदत होते. पण यंदा २०२०-२१ च्या खरीप हंगामात एप्रिल ते जुलै या कालावधीत प्रमाणापेक्षा जास्त युरिया खत खरेदी केलेल्या २० शेतकऱ्यांची नावे पुढे आली आहेत.
वर्ध्यात 18 कृषी केंद्राचा परवाना निलंबित, रासायनिक खत विक्रीत अनियमितता - fertiliser licences suspended news
वर्ध्यात 18 कृषी दुकानांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. खत विक्रीमध्ये अनियमितता असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार कृषी केंद्रांनी एकाच शेतकऱ्याचे नाव आणि आधार कार्डचा वापर करून युरिया खत विक्री केली. मात्र प्रत्यक्षात सदर युरिया खत इतर शेतकऱ्यांना विक्री करून अनियमीतता केल्याचे तपासणीत निष्पन्न झाले होते.