ETV Bharat / state

अधुऱ्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी शेवट; प्रेमी युगलाने विहिरीत उडी घेत संपवले जीवन - wardha suicide

प्रेमसंबधात असुनही लग्न होऊ शकत नसल्याने दोघांनी विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. छगन उर्फ बंटी गिरी (वय २४) आणि रजनी दिलीप तुमडाम (वय २१) असे आत्महत्या केलेल्या प्रेमी युगलाचे नाव आहे.

विहिरीतील मृतदेह
author img

By

Published : Feb 20, 2019, 9:07 PM IST

वर्धा - जिल्ह्यातील खरांगणा येथे एका शेतात बुधवारी सकाळी तरुण आणि तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली. प्रेमसंबधात असुनही लग्न होऊ शकत नसल्याने दोघांनी विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. छगन उर्फ बंटी गिरी (वय २४) आणि रजनी दिलीप तुमडाम (वय २१) असे आत्महत्या केलेल्या प्रेमी युगलाचे नाव आहे.

घटनेची माहिती देताना पोलीस

तरुणीचा दुसऱ्या एका मुलासोबत साखरपुडाही झाला होता. त्यामुळे दोघांचे लग्न होऊ शकणार नसल्याने अधुऱ्या प्रेमकहाणीचा अंत त्यांनी जीवन संपवून केला. मदनी येथील युवराज पुनवटकर यांना शेतामध्ये काम करत असताना विहिरीमध्ये दोन मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. त्यानी याबाबतची माहिती पोलीस पाटील अमित धोपटे यांना दिली. तसेच घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. याचा तपास करत असताना मंगळवारी संध्याकाळी गावातून छगन आणि रजनी हे दोघे पळून गेल्याची माहिती समजली. त्यामुळे हे मृतदेह या दोघांचे असल्याची खात्री पटवण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविलेले आहेत. पुढील तपास सुरू असल्याची माहिती ठाणेदार संतोष शेगावकर यांनी दिली. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे

Intro:R_MH_20_FEB_WARDHA_PREMIYUGALACHI_ATMHATYA_vis& byte
1 फाईल ftp केली आहे.

अधुऱ्या प्रेमकहाणीचा शेवट आत्महत्येने, प्रेमीयुगालानी विहिरीत उडी घेत केली आत्महत्या

वर्धा - खरांगणा पोलिस स्टेशन अंतर्गत मदनी येथील एका शेतात आज सकाळी मुला मुलीचे मृतदेह आढळून आल्याने चांगलीच खबळळ उडाली. प्रेम केले पण लग्न होऊ शकत नसल्याने दोघांनी विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. मुलाचे नाव छगन उर्फ बंटी गिरी(24) तर रजनी दिलीप तुमडाम(21)असे मुलीचे नाव आहे. नुकताच मुलीचा साखरपुडा झाला असून दोघांचे लग्न होऊ शकणार नाही. यामुळेच अधुऱ्या प्रेमकहाणीचा अंत आत्महत्येने केला. या घटनेने गावात मात्र सर्वत्र चर्चेला उधाण येऊन शोककळा पसरली आहे.

मदनी येथील युवराज पुनवटकर यांचे शेत आहे. आज सकाळी गव्हाला ओलीत करण्यासाठी गेले असता पाणी तुटल्याने विहिरीकडे जाऊन पाहिले. त्यावेळी त्यांना दोन मृतदेह आढळून आले. याची माहिती पोलीस पाटील अमित धोपटे यांनी दिली. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना मिळताच दाखल झाले. त्यावेळी काल संध्याकाळी छगन आणि रजनी हे दोघे पळून गेल्याची चर्चा होती मात्र हे मृतदेह त्यांचेच असल्याने चर्चेला विराम मिळाला.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून छगन बंटी आणि रजनी यांच्याकडून शवविच्छेदनासाठी पाठविलेले आहे घराची नोंदणी करून पुढील तपास सुरू केल्याची माहिती ठाणेदार संतोष शेगावकर यांनी दिली.

पंधरा दिवसांपूर्वीच झाला होता रजनीच्या साक्ष साखरपुडा

छगन उर्फ बंटी आणि रजनी यांचे प्रेमसंबंध होते. मात्र रजनीचे लग्न बाहेरगावी एका मुलासोबत घरच्यांनी जोडले होते. पंधर दिवसापूर्वीच तिचा साखरपुडा सुद्धा आटोपला होता. पण रजनी आणि छगन ने घेतलेल्या लग्न करण्याचा आणाभाका पूर्ण होऊ न शकणार नाही. त्यामुके दोघांनी या प्रेमाचा अंत आत्महत्येने करण्याचा निर्णय घेतला असावा. काल संध्याकाळी दोघेही घरा बाहेर पडले. युवराज पुनवटकर यांच्या शेतात दोघांनी उडी घेत जीवन यात्रा संपवली.

Body:पराग ढोबळे, वर्धा.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.