ETV Bharat / state

आघाडीच्या काळात हक्काचा पैसा न मिळाल्याने विदर्भावर अन्याय - मुख्यमंत्री - devendra fadnvis

20 हजार कोटींचे सिंचनाची कामे विदर्भात सुरू आहेत. माझे आव्हान काँग्रेस,राष्ट्रवादीला आहे कि, सरकारला सांगा मागील 15 वर्षात विदर्भाच्या हिस्याचा पैसा का मिळाला नाही. भाजप सरकारने सर्वांना पैसे दिले. कोणाचे पैसे पळवले नाहीत. महाराष्ट्राच्या तिजोरीतून विदर्भाचा पैसा विदर्भाला देऊन विकास केल्याचे म्हणत काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने विदर्भावर अन्याय केल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी केली.

मुख्यमंत्री
author img

By

Published : Aug 2, 2019, 8:30 AM IST

Updated : Aug 2, 2019, 12:41 PM IST

वर्धा- विदर्भाला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. सध्या 20 हजार कोटींची सिंचनाची कामे विदर्भात सुरू आहेत. माझे काँग्रेस, राष्ट्रवादीला आव्हान आहे की, मागील 15 वर्षात विदर्भाच्या हिश्श्याचा पैसा का मिळाला नाही. भाजप सरकारने सर्वांना पैसे दिले. कोणाचे पैसे पळवले नाहीत. महाराष्ट्राच्या तिजोरीतून विदर्भाचा पैसा विदर्भाला देऊन विकास केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने विदर्भावर अन्याय केल्याचा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी वर्ध्यातील आयोजित जाहीर सभेत केला आहे.

मुख्यमंत्री
भाजपकडून महाजनादेश यात्रा काढण्यात येत आहे. त्यानिमित्त वर्ध्यात गुरुवारी सायंकाळी सर्कस ग्राऊंडवर जाहीर सभेचे आयोजन करण्यात होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, विदर्भावर झालेला अन्याय दूर करण्याचे काम भाजप सरकारने केले. याआधी विदर्भाची वाईट अवस्था होती, कृषी पपंचा मोठा बॅकलॅाक होता. 2014 मध्ये भाजप सरकार सत्तेवर आले, तेव्हा 2009 मध्ये पैसे भरूनही अर्ज केलेल्यांना कनेक्शन मिळाले नव्हते. त्यामुळे पाच वर्षात मागचा पूर्ण बॅकलॅाक आम्ही भरून काढला. केवळ कृषी पपांच्या आधारावर साडे चार लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली. एकट्या वर्धा जिल्ह्यात 45 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मागील 30 वर्षात जेवढा निधी मिळाला नाही तेवढा निधी पाच वर्षात दिला

पाच वर्षात 30 हजार गावांना पाणीपुरवठा होत होता. भाजपने पाच वर्षात 18 हजार गावांना पाणी दिले. वर्ध्याला अमृत योजना देऊन 105 गावाचा पाणी प्रश्न सोडला. महाराष्ट्र निर्मितीपासून किंवा मागील 30 वर्षांपासुन जितका निधी मिळाला नसेल, तेवढा निधी पाच वर्षात दिला आहे. हिंगणघाट येथे टेक्स्टाईल आणून 15 हजार लोकांना काम दिले. समृद्धी महामार्ग, ड्रायपोर्ट लवकरच तयार होतील. या महामार्गाच्या माध्यमातून जेएनपीटीला जोडले जाईल. यामुळे मोठे विकासाचे मार्ग खुले होतील असे मुख्यमंत्री म्हणाले.

वर्धा गांधीजींची भूमी आहे. गांधीजींनी सांगितले होते, भारत स्वतंत्र झाला आता काँग्रेस विसर्जित करा. पण काँग्रेसने ते ऐकले नाही. 2014 साली वर्धा जिल्ह्याने गांधीजींचे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवले. 2014 पासून 2019 पर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्यात काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसचे विसर्जन करून ती नावालाही शिल्लक ठेवली नाही. थोडी शिल्लक आहे. मात्र, तेही शिल्लक ठेवणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत चारही आमदार भाजपचे निवडणून द्या आणि जिल्हा काँग्रेस मुक्त करा असाच संदेश यामाध्यमातून त्यांनी दिला.

पुलगावला तहसीलचा दर्जा देऊ
पुलगाव येथील सभेत बोलताना पुलगावला तहसीलचा दर्जा मिळेल असा शब्द देतो. महाराष्ट्रात येत्या काळात पहिली तहसील बनेल ती पुलगावच असेल असा शब्द या निमित्याने मुख्यमंत्र्यांनी पुलंगावच्या जनतेला स्वागत सभेतून दिला. यावेळी मंचावर, कृषीमंत्री संजय बोंडे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे, खासदर रामदास तडस, आमदार पंकज भोयर, जिल्हा परिषद सदस्य नितीन मडावी, संजय तिगावकर, सुनील गफाट, सुधीर दिवे यांची उपस्थिती होती.

Intro:वर्धा
काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारला आव्हान, 15 वर्षात विदर्भाचे हक्काचे पैसे का मिळाले नाही- मुख्यमंत्री

आज विदर्भाला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. आज 20 हजार कोटीचे सिंचनाचे कामे विदर्भात सुरू आहे, माझे आव्हान आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारला सांगा मागील 15 वर्षात विदर्भाच्या हिस्याचा पैसे का मिळाले नाही. भाजप सरकारने सर्वांना पैसे दिले, कोणाचे पैसे पळवले नाही, महाराष्ट्राच्या तिजोरीतून विदर्भाचा पैसा विदर्भाला देऊन विकास केल्याचे म्हणत काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने विदर्भावर अन्याय केल्याची टीका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी केली..

मुख्यमंतरी यांची महाजनादेश यात्रेच्या पहिल्या दिवशी सायंकाळी वर्ध्यात सर्कस ग्राऊंडवर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

पुढे बोलताना म्हणाले विदर्भावर झालेला अन्याय दूर करम्याचे काम भाजप सरकारने केले. विदर्भचा वाईट अवस्था होती, कृषी पपंचा मोठा बॅकलोक होता. 2014 मध्ये सरकार सत्तेवर आले तेव्हा 2009 पैसे भरूनही अर्ज केलेल्याना पाच वर्षे लोटून कनेक्शन मिळाले नव्हते. पाच वर्षात पूर्ण बॅकलोक भरून काढला. केवळ कृषी पपंचा आधारावर साडे चार लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली. एकट्या वर्धा जिल्ह्यात 45 हजार हेक्टर जमीन सिंचनाचा खाली आणल्याचे मुख्यमंत्री म्हणाले...

दावा आहे मागील 30 वर्षात नाही मिळाला एवढा निधी पाच वर्षात दिला....
पाच वर्षात 30 हजार गावांना पाणीपुरवठा व्हाचा, भाजपने पाच वर्षात 18 हजार गावांना पाणी दिले, वर्धेला पाणी पुरवठा अमृत योजना देऊन 105 गावाचा पाणी प्रश्न सोडला. दावा आहे महाराष्ट्र निर्मितीपासून किंवा मागील 30 वर्षाचा जितका निधी मिळाला नसेल तेवढा निधी पाच वर्षात दिला आहे असा दावा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

हिंगणघाट येथे टेक्स्टाईल आणून 15 हजार लोकांना काम दिले. समृद्धी महामारह, ड्रायपोर्ट पुढच्या वर्षात तयार केली. या महामार्गाच्या माध्यमातून जेएनपीटीला जोडले जाईल आणि मोठं विकासाचा मार्ग खुला होईल, सात तासात पोहचल्याने मोठे मोठाले प्रोजेक्त येऊन हजारो बेरोजगाराना काम मिळेल असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले...

वर्धा गांधीजींची भूमी आहे, त्यानी सांगितले होते भारत स्वतंत्र झाला आता काँग्रेस विसर्जित करा, पण काँग्रेसने ऐकले नाही. 2014 साली वर्धा जिल्ह्याने गांधीजींचे स्वप्नां पूर्ण करण्याचे ठरवले. 2014 पासून 2019 पर्यत जे जे निवडणूक झाली त्यात काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेस आता विसर्जित करून नावालाही काँग्रेस शिल्लक ठेवली नाही. थोडी शिल्लक राहिली तेही शिल्लक ठेवणार नाही मला माहिती आहे असे म्हणत येत्या विधानसभा निवडणुकीत चारही आमदार भाजपचे निवडणून द्यावे असा सुरू धरत काँग्रेस मुक्त जिल्हा करा असाच संदेश यामाध्यमातून दिला.

पुलगावला तहसीलदर्जा देऊ

यावेळी पुलगाव येथे स्वागर सभेत बोलताना पुलगावला तहसीलदर्जा मिळावा ही मागणी आहे. यावेळी शब्द देतो महाराष्ट्रात येत्या काळात पहिली तहसील बनली तर ती पुलगाव असेल असा शब्द या निमित्याने मुख्यमंत्र्यांनी पुलंगावच्या जनतेला स्वागत सभेतून जनतेला दिला.

यावेळी मंचावर, कृषीमंत्री संजय बोंडे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे, खासदर रामदास तडस, आमदार पंकज भोयर, जिल्हा परिषद सदस्य नितीन मडावी, संजय तिगावकर, सुनील गफाट, सुधीर दिवे,

Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
Last Updated : Aug 2, 2019, 12:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.