ETV Bharat / state

कुंपणच खाते शेत! जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्याकडून औषधांची विक्री,  व्हिडिओने खळबळ

जिल्हा सामान्य रुग्णालयात सामान्य नागरिकांना मोफत औषध उपलब्ध करून दिले जाते. पण त्यांच्या हक्काचे औषध हा कर्मचारी पैसे घेऊन विकत होता. हा कर्मचारी कक्षसेवक म्हणून येथे कार्यरत आहे.

जिल्हा सामान्य रूग्णालय, वर्धा
author img

By

Published : Jul 18, 2019, 9:34 AM IST

Updated : Jul 18, 2019, 11:30 AM IST

वर्धा - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचारी रुग्णांकरीता आलेली औषधे बाहेरील व्यक्तीला विकत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी लगेच या कर्मचाऱ्याची बदली करत चौकशी सुरू केली. मात्र, या धक्कादायक प्रकाराने सामान्य नागरिकांसाठी असणारे औषध विकले जात असल्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. विलास रघाताटे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातून कक्ष कर्मचारी विकतो औषध, व्हिडीओने खळबळ

जिल्हा सामान्य रुग्णालयात सामान्य नागरिकांना मोफत औषध उपलब्ध करून दिले जाते. पण त्यांच्या हक्काचे औषध हा कर्मचारी पैसे घेऊन विकत होता. हा कर्मचारी कक्षसेवक म्हणून येथे कार्यरत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या कर्मचाऱ्यावर तत्काळ कारवाई करत त्याची कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात बदली करण्यात आली आहे. याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

हायड्रोजन पॅराऑक्साइड हे औषध विकल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. हे औषधाचा सलूनमध्ये डाय करण्यासाठी वापर होत असाव्. तसेच यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असल्याने पिकांवर फवारणीसाठी वापर होत असल्याचा व्हिडिओच्या संभाषणावरून वाटत आहे.

या घटनेने जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू असलेला भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. यामुळे अशा प्रकाराने इतरही औषधांची विक्री होत असल्याचा संशय आहे. यांसारख्या प्रकरणांना आळा बसावा, यासाठी औषधांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज आहे.

Intro:वर्धा

जिल्हा सामान्य रुग्णालयातून धक्कादायक प्रकार, कक्ष कर्मचारी विकतो औषध

- व्हाट्सएपला व्हायरल झालेल्या व्हिडीओन खळबळ

- व्हिडिओतील कर्मचाऱ्याची बदली करत चौकशी सुरु

वर्धेच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचारी रुग्णांकरिता आलेली औषध बाहेरच्या व्यक्तीला विकत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.. या व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली. जिल्हा शल्यचिकित्सकानी कर्मचऱ्याची बदली करत चौकशी सुरू केली. मात्र हा धक्कादायक प्रकाराने सामान्य नागरिकांसाठी असणारे औषध विकत असलेल्या प्रकाराने चांगलीच खळबळ माजली आहे. विलास रघाताटे असे या कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

व्हिडिओत दिसणारा कर्मचारी हा कक्षसेवक म्हणून कार्यरत आहे. विलास रघाटाटे अस नाव आहे. सामान्य रुग्णालयात सामान्य नागरिकांना मोफत औषध उपलब्ध करून दिले जाते. पण त्यांचा हक्काचे औषध हा कर्मचारी पैसे घेऊन विकत असल्याचे व्हिडीओत दिसून येत आहे. तो हायड्रोजन पॅराऑक्साइड विकत असल्याच व्हिडिओत दिसत आहे.

या व्हिडिओनंतर कर्मचारी विलास याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली. कारंजा येथील ग्रामीण बदली करण्यात आली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. हायड्रोजन पॅरॉक्साईड आणि स्पिरिट हे सलूनमध्ये डाय करण्यासाठी होत असावा. तसेच अल्कोहोलचे प्रमाण जास्त असल्याने पिकांवर फवारणीसाठी वापर होत असल्याचा व्हिडीओच्या संभाषणावरून वाटतंय.

या व्हिडीओने जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू असलेला भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. यामुळे अश्या प्रकाराने इतरही औषधींची विक्री होत असल्याचा संशय आहे. अशा प्रकरणांना आळा बसावा यासाठी औषधीची विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाईची गरज आहे.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
Last Updated : Jul 18, 2019, 11:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.