वर्धा - पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मंत्री सुनील केदार यांची कोरोना चाचणी गुरुवारी (दि. 3 सप्टें) पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. केदार हे मंगळवारी नागपुरात होते. त्यांनी जिल्ह्यातील विविध भागात पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त गावांना भेटी देत पाहणी केली. यानंतर ते मुंबईला रवाना झाले. गुरुवारी सकाळी त्यांना ताप आला. अस्वस्थ वाटत असल्याने ते दुपारी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात गेले व कोरोनाची अॅन्टीजन चाचणी करून घेतली होती त्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
त्यानंतर सायंकाळी आरटीपीसीआरच्या चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आले. या चाचणीचा अहवाल उद्या (शुक्रवारी) येणे अपेक्षित आहे. दरम्यान, केदार यांच्या नागपूर कार्यालयातील कर्मचाऱ्यांचीही खबरदारी म्हणून चाचणी करण्यात आली आहे. ते वर्ध्यात 15 ऑगस्टला ध्वजारोहण कार्यक्रमावेळी आले होते. यामुळे त्यांचा संपर्कात आलेल्या वर्ध्यातील नागरिकांचा कालावधी 14 दिवसाच्यावर असल्याने येथील नागरिकांची मात्र अद्याप कोरोनाची चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही.
पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण
राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.