वर्धा - वर्ध्यापासून काही अंतरावर असलेल्या इंजापूर शिवारात एका शेतात मध्यरात्रीच्या सुमारास अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने देण्यात आली. यात मध्यरात्री विना परवानगी उत्खनन सुरू असल्याचे दिसून आले. यावर अनेक अधिकाऱ्यांनी फोन न उचलल्याने महिला नायब तहसीलदार शकुंतला पराजे यांनी कारवाई केली आहे. यात पाच टिप्पर आणि पोकलँड जप्त केल्याची कारवाई करण्यात आली. यात महसूल विभागाकडून संबंधित त्रिनेवा कंपनीला नोटीस बजावले असल्याचे सांगितले जात आहे.
अनेक अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद नाही
जिल्ह्यात सध्या रस्ते महामार्ग निर्माणाचे कार्य सुरू आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात मुरूम, गिट्टी, रेती यासारख्या गौण खनिजांची गरज आहे. यासाठी शासनाकडून परवानगी दिली जाते. पण यात परवानगी नसली तरी मोठ्या प्रमाणत उत्खनन असल्याच्या तक्रारी होत आहे. पण कारवाई करण्याऐवजी सर्व काही नियमात असल्याचा आव आणला जातो. यात अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त उचल किंवा आदेशानुसार कामकाज न करता विना परवानगी अवैध उत्खनन सुरू असल्याच्या आरोप केला जात आहे. मध्यरात्री अवैधरीत्या उत्खनन सुरू असल्याची माहिती बजरंग दलाच्या काही पदाधिकाऱ्यांनी वर्ध्याचे उपविभागीय अधिकरी सुरेश बगळे यांना फोन वरून संदेश पाठवून माहिती देण्याचा प्रयत्न केला. पण काहीच रात्री उत्तर मिळाले नसल्याचा आरोप बजरंग दलाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष अनुप जयस्वाल यांनी केला.
यात मध्यरात्रीपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून तसेच संदेश पाठवून माहिती देण्याचा प्रयत्न केला. पण फोन उचलण्यात आला नाही. यासह संदेशाचे उत्तर आले नसल्याचे सांगितले जात आहे. यानंतर महिला नयाब तहसीलदार शकुंतला पराजे यांना माहिती देण्यात आली. यात त्यांना माहिती मिळताच त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन जाऊन पाहणी केली. यात त्रिनेवा कन्स्ट्रक्शन कंपनीकडे परवाना नसल्याने त्यांच्यावर नियमानुसार पंचनामा करत कारवाई करण्यात आली. यात चार टिप्पर हे मुरूम भरून एक रिकामा टिप्पर आणि एक पोकलँड असा एक कोटीचा माल जप्त केला आहे.
या याप्रकरणात 5 टिप्पर आणि पोकलँड जप्त करण्यात आले आहे. यामध्ये परवानगी नसताना किती उत्खनन झाले, याचे मोजमाप करण्यात येणार आहे. यासह त्यांच्याकडून खुलासा मगावण्यात येईल, असे सांगितले. यासह रात्रीचे उत्खनन करण्यास परवानगी देण्यात येत नाही. यात नेमके काय झाले, त्याची चौकशी होईल. त्यानंतर कारवाई होणार असल्याची माहिती तहसीलदार संजय नागटिळक यांनी ईटीव्ही भारताला दिली.