आर्वी (वर्धा) - सुट्टी नाकारल्याने अंधाधुंद गोळीबार करत हत्या करणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) जवान तब्बल 29 वर्षांनी पोलिसांच्या हाती लागला. सुभाष रामकृष्ण नाखले हा (रा. धनोडी बहाद्दरपूर, आर्वी) असे या आरोपीचे नाव आहे.
29 वर्षांपूर्वीची घटना काय?
सुभाष नाखले हा सीआरपीएफमध्ये त्रिपुरा राज्यातील कंचंपूर येथे 45 बटालियनमध्ये कार्यरत होता. संत्री गार्ड म्हणून तो सेवा बजावत होता. मात्र, त्याच्या कुटुंबातील एका सदस्याचा मृत्यू झाल्याने त्याला सुट्टी पाहिजे होती. मात्र, सुटी नाकारल्याच्या रागातून त्याने 3 जून 1992 या दिवशी अंधाधुंद गोळीबार केला. या अंधाधुंद गोळीबारमध्ये सीआरपीएफचे गार्ड कमांडर लान्सनायक यांचा मृत्यू झाला होता. तर अन्य सहकारी जखमी झाले होते. यानंतर आरोपी फरार झाला होता. यानंतर जवळपास 29 वर्षांनी या आरोपी जवानाला ताब्यात घेण्यात आले. आर्वीचे ठाणेदार संजय गायकवाड यांनी ही कारवाई केली. सुभाष नाखले असे आरोपीचे नाव आहे. मात्र, तो नाव बदलून राहत होता.
दरम्यानच्या काळात त्रिपुराच्या कंचंनपूर येथील पोलिसांनी याबाबतची माहिती स्थानिक आर्वी पोलिसांना दिली होती. याचदरम्यान नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांना सांगून याबाबतचा तपास सुरू केला. मात्र, सुभाष सापडत नव्हता. 2012मध्ये एकदा मध्यरात्री तो 2 तासांसाठी आला होता. यामुळे तो जिवंत असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे आर्वी पोलीस पुन्हा त्याच्या शोधात होते. यात तो काही दिवसांपूर्वी मुळगावी धनोडीला संपत्तीच्या हिस्सा पाहिजे म्हणून आला होता. याबाबतची माहिती मिळताच सावधानपूर्वक त्याला ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा - चालकाचे नियंत्रण सुटल्याने ३ जणांचा मृत्यू, भरधाव कारचा अक्षरशः चुराडा
नाव बदलून झाला बिगारी कामगार -
गोळाबाराच्या घटनेनंतर जवळपास 29 वर्षांपासून तो फरार होता. दरम्यान, त्याने लपून राहण्यासाठी कालांतराने स्वतःचे नाव बदलले, अशी माहिती सुभाषने आर्वी पोलिसांना सांगितले. अटक होईल या भीतीने त्याने त्याची पत्नी, मुलगी यांच्याशी संपर्क साधला नाही. यामुळे त्याचा शोध घेण्यास अडचण झाली. काही काळ तो जळगाव जिल्ह्यातही राहिला. त्यानंतर गुजरातमध्ये सालदार म्हणून राहिला. तर भिवंडी वाळू उपसाच्या कामावर मजूरही होता. तर काही काळ उदरनिर्वाहसाठी तो बिगारी काम करत राहिला. तो गरजेनुसार पत्ता आणि आणि नाव बदलत राहिला.
नाव बदलवत केला दुसरा विवाह -
अशोक तुकाराम मोरे याच नावाने तो कल्याण अंबरनाथ तालुक्यात पालगाव येथे राहिला. 10 ते 12 वर्षांपासून त्याने नाव बदलून घेतले. याच काळात त्याने दुसरे लग्नही केले.
आर्वी पोलिसांनी सीआरपीएफ बटालियन, त्रिपुराच्या कंचनपुरा पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. दिली. पुढील तपासासाठी त्याला कंचंनपूर पोलिसांना सोपवले जाईल अशी माहिती पुढे येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पांडुरंग पुगनर, भगवान बावणे, प्रभाकर वाढवे, रणजित जाधव, अनिल वैद्य, अतुल भोयर, प्रदीप दातारकर, सतीश नंदागवळी, अतुल पोटफोडे यांनी केली.
हेही वाचा - #इंधन दरवाढ : वर्ध्यात युवक काँग्रेसने पंतप्रधानांची ऑडिओ क्लिप वाजवत काढली सायकल यात्रा